टँकरने पाणी पुरवठा करण्याची गोंडवाना गणतंत्र पार्टीची मागणी #Jivati

जिवती तालुक्यातील आसापूर येथे पाणीटंचाई
जिवती:- राजुरा विधानसभा क्षेत्रातील जिवती तालुक्यातील ग्रा. पं. आसापूर अंतर्गत येणाऱ्या आसापूर गावात या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. विहीर आणि आता बोअरवेल मध्ये पाणी नसल्याने गावकरी चिंतेत असून पावसाळ्याच्या आगमनापूर्वी टंचाईच्या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. आता तातडीने टँकर उपलब्ध करून पाणीपुरवठा करावा अशी मागणी गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी केली. या संदर्भात गावकर्यांसह जुमनाके यांनी गट विकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले.
या गावात पाणी पुरवठा करणाऱ्या पिणाच्या पाण्याच्या विहिरीचे बांधकाम आक्टोबर 2021 मध्ये ढासळले असून दुसरे बोअरवेल पूर्णपणे कोरडे पडलेले आहे. त्यामुळे गावकर्यांना सध्यास्थितीत पिण्याचा एक थेंबही पाणी नाही. याविषय गावकर्यांनी ग्रामपंचायत कार्यालयात गाऱ्हाने मांडले. मात्र पाण्याची सोय झाली नाही.
गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी आसापूर गावाला भेट दिली असता गावात पाणी टंचाई असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी ग्रामवासियांची समस्या घेऊन जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन तात्काळ टँकरची सुविधा ‌ देण्याची मागणी केली.
ही समस्या तात्काळ न सोडवल्यास गावाकऱ्यांसह आंदोलन करू असा गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके यांनी दिला. यावेळी आसापूर गावातील गावकरी व गोंडवाना गणतंत्र पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत