Top News

"मुख्याधिकारी हाजीर हो" #chandrapur #gadchandur #Korpana

ग्रिनजीम प्रकरणी उच्च न्यायालयाचा नोटीस

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना

कोरपना:- कोरपना तालुक्यात सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेत साहाय्य निधी अंतर्गत शहरातील ओपनस्पेस मध्ये 11 ठिकाणी अंदाजे 59 लाखांचे ओपन ग्रिनजीम बसवण्यात आले.काही दिवसाच याती काही वस्तू मोडकळीस आले असून सदर जिमच्या वस्तू अत्यंत हलक्या दर्जाचे असल्याचे आरोप सुरूवाती पासुनच नागरिकांकडून होताना दिसत आहे.सदर कामात मोठ्याप्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची शक्यता व्यक्त करत यासंदर्भात सखोल चौकशी करून संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी वजा तक्रार नगरपरिषदेत भाजपचे विरोधी पक्ष नगरसेवक अरविंद डोहे यांनी जिल्हाधिकारी व नगरविकास मंत्रालय यांच्याकडे केली होती.

बरेच दिवस लोटूनही तक्रारीची दखल न घेतल्याने अखेर डोहे यांनी 28 आॕक्टोंबर 2021रोजी उच्च न्यायालयात रिट पिटीशन क्र 5082/2021 दाखल केली. त्या संदर्भात येत्या 24 जून रोजी न्यायालयात सुनावणी असून गडचांदूर मुख्याधिकारी, नगरविकास सचिव मंत्रालय मुंबई व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना याबाबतचा खुलासा दाखल करण्यासाठीची नोटीस उच्च न्यायालयाने बजावली आहे.आता यावर मुख्याधिकारी व इतर काय खुलासा देणार आणि मा. उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे गडचांदूरकरांचे लक्ष लागले आहे.आणखी बऱ्याच तक्रारी केल्या असून अजूनही चौकशी होत नसल्याने परत उच्च न्यायालयात जाणार असल्याचे मत नगरसेवक अरविंद डोहे यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने