Top News

काँग्रेसचा हात सोडून कमळ हाती, हार्दिक पटेल यांचा भाजप प्रवेश #gujrat


गुजरात:- काँग्रेसचा हात सोडून हार्दिक पटेल यांनी आज भाजपात प्रवेश केलाय. त्यांनी दोन दिवसांपूर्वी स्वतः याबाबतची घोषणा केली होती. गुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही मोठी राजकीय घडामोड मानली जातेय. याचा काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. हार्दिक पटेल हे पाटीदार समाजाचं नेतृत्त्व करतात. पाटीदार समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी हार्दिक पटेल यांनी आंदोलन छेडलं होतं. त्यामुळे हा समाज भाजपच्या दिशेने हार्दिक पटेल यांच्या रुपात वळेल, असं सांगितलं जातंय. हार्दिक पटेल यांच्या भाजप प्रवेशांची जंगी तयारीही करण्यात आली आहे. सकाळी दुर्गापुजा केल्यानंतर हार्दिक पटेल हे गांधीनगर कमलम कार्यालयाकडे रवाना होतील आणि त्यानंतर भाजपच्या वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत भगवा फडकलाय.
काँग्रेसच्या राष्ट्रीय विचार शिबिरालाही हार्दिक पटेल यांची गैरहजेरी चर्चेता विषय ठरली होती. तसंच दाहोद आदिवासी कार्यक्रमालाही त्यांनी दांडी मारलेली. हे सगळे हार्दिक पटेल यांच्या काँग्रेस सोडण्याचे संकेत असल्याचं बोललं जात होतं. अखेर हार्दिक पटेल यांनी आज भाजपात अधिकृतपणे प्रवेश केलाय. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी जंगी कार्यक्रम घेतला गेला.
काँग्रेस सोडताना काँग्रेसवर टीका…

सोनिया गांधी यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात हार्दिक पटेल यांनी आपल्या मनातील खदखद मांडली होती. गुजराती अस्मितेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलेला होता. काँग्रेस आता देश आणि समाजाहिताच्या बरोबर उलट काम करत असल्याचं हार्दिक पटेल यांनी म्ह्टलं होतं. काँग्रेस फक्त विरोधाचं राजकारण केलं. त्यापलिकडे काँग्रेसनं काहीच केलं नाही, असंही त्यांनी पत्रात म्हटलं होतं. कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आलेल्या हार्दिक पटेल यांनी आपली नाराजीही उघड केली होती. कार्यकारी अध्यक्ष केलं, पण जबाबदारी कोणतीच दिली नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. शिवाय सातत्यानं मला डावलण्यात आलं, असा आरोपही त्यांनी केला होता.
भाजपचं कौतुक

काँग्रेसला सोडचिट्ठी देण्याआधी हार्दिक पटेलने भाजपच्या राम मंदिर, सीएए, एआरसीसारख्या निर्णयांचं भरभरुन कौतुक केलं होतं. आता भाजपात हार्दिक पटेलला कोणती जबाबदारी दिली जाते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. स्टार प्रचारकाच्या भूमिकेत हार्दिक पटेल दिसण्याची शक्यता आहे. तसंच येत्या काळात भाजप हार्दिक पटेलला उमेदवारीही देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने