💻

💻

पती-पत्नीच्या अंगावर कोसळली वीज #chandrapur #Rajura

पती ठार, पत्नी गंभीर जखमी

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- शेतीचं काम करीत असतांनाच विज कोसळली.यात पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर पत्नी गंभीररीत्या जखमी आहे. ही दुर्दैवी घटना राजूरा तालुक्यातील कोडापेगुडा शेतशिवारात घडली.
मानकू रामू कोडापे (30) असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.तर त्यांचा पत्नी जंगूबाई कोडापे या गंभीररीत्या जखमी आहे. जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात आज दुपारी मेघ गर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावली.
कोडापेगुडा येथे कोडापे दांपत्य आपल्या शेतात काम करीत होते. त्याच दरम्यान अचानक वीज कोसळली. यात युवा शेतकरी मानकु कोडापे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांचा पत्नी गंभीररीत्या जखमी झाल्या आहेत. जखमी अवस्थेत राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. युवा शेतकऱ्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत