Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

नागपूर-चंद्रपूर मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्‍याचा निर्णय #chandrapur

आ. मुनगंटीवार यांनी केले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अभिनंदन !

ही मेट्रो बल्‍लारपूर पर्यंत धावणार, श्री. नितीन गडकरी यांची मान्‍यता.
चंद्रपूर:- नागपूर-चंद्रपूर या मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय घेतल्‍याबद्दल माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय भुपृष्‍ठ परिवहन मंत्री श्री. नितीनजी गडकरी यांचे अभिनंदन करत आभार व्‍यक्‍त केले आहे. ही मेट्रो बल्‍लारपूर पर्यंत वाढविण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. नितीनजी गडकरी यांच्‍याकडे केली. श्री. गडकरी यांनी ही मेट्रो बल्‍लारपूर पर्यंत वाढविण्‍याची मागणी मान्‍य केली आहे.
नागपूर-चंद्रपूर या मार्गावर ब्रॉडगेज मेट्रो सुरू करण्‍याची मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍यासह भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाने श्री. नितीनजी गडकरी यांच्‍याकडे केली होती. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. नितीनजी गडकरी यांच्‍याकडे सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला. चंद्रपूर जिल्‍हा राज्‍यातील प्रमुख औद्योगिक जिल्‍हा आहे. चंद्रपूर शहराचे ऐतिहासिक महत्‍व विशेष आहे. नागपूर-चंद्रपूर हा प्रवास अत्‍यल्‍प दरात व्‍हावा व जलदगतीने हे अंतर पूर्ण व्‍हावे अशी भुमीका या मेट्रो संदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडली. आज या निर्णयानंतर श्री. नितीनजी गडकरी यांचे अभिनंदन करताना ही मेट्रो जिल्‍हयातील दुसरे प्रमुख औद्योगिक शहर बल्‍लारपूर पर्यंत वाढवावी अशी मागणी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी श्री. गडकरी यांच्‍याकडे केली. या मागणीला देखील श्री. नितीनजी गडकरी यांनी तात्‍काळ मान्‍यता दिली.
नागपूर-चंद्रपूर-बल्‍लारपूर या मार्गावर लवकरच ब्रॉडगेज मेट्रो धावणार असल्‍याने चंद्रपूर, बल्‍लारपूर येथील नागरिकांना प्रवासाची उत्‍तम सोय उपलब्‍ध होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत