Top News

पावसाने माणिकगड पहाडातील धबधबे खळाळले #Korpana #chandrapur


नदी, नाले, जलाशय तुडुंब; पर्यटकांचा ओघ निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्याकडे

कोरपना:- निसर्ग सौंदर्याने नटलेल्या व पर्वतराजी माणिकगड पहाडाच्या डोंगरदऱ्यात असलेले धबधबे मुसळधार पावसाने ओथंबून वाहू लागले आहे.त्यामुळे त्यांचे सौंदर्य आपल्या डोळ्यात साठविण्यासाठी व निसर्गाच्या शावरचा मनमुराद आनंद घेण्यासाठी अनेक हौसी पर्यटक व ट्रेकर्स ची पाऊले या स्थळी वळली आहे.
🌄
माणिकगड पहाड हा तसा निसर्ग सौंदर्याची अलौकिक देणच आहे. या परिसरातील कोरपना व जिवती तालुक्याच्या सीमावर्ती भागात अनेक पर्यटन स्थळे आहे. त्यामुळे अनेकांचा ओढा या भागात पावसाळी पर्यटनासाठी वळतो आहे. कोरपना तालुक्यातील सावलहीरा-येल्लापुर मार्गावरील भिमलकुंड धबधबा, उमरहिरा, टांगला
जांभुळधरा गावाजवळच्या जंगलातील धबधबे, घाटराई जंगलातील धबधबा, जेवरा येथील खडकया धबधबा,मेहंदी गावा जवळच्या नाल्यावरील बोदबोदी धबधबा, पैनगंगा-विदर्भा नदी संगमावरील संगमेश्वर धबधबा व जिवती तालुक्यातील चिखली व सिंगारपठार येथील धबधबा सध्या ओसंडून वाहत असल्याने अनेक हौशी पर्यटक व ट्रेकर्स ना उत्साही पर्वणीच ठरते आहे.
🌄
कोरपना तालुक्यातील बोदबोदी वगळता इतर ठिकाणच्या धबधब्यावर जाण्यासाठी कुठेच पक्का रस्ता नाही. तरी मात्र दरवर्षी बरेच पर्यटक कुतूहला पोटी या ठिकाणी भेटी देत असतात. आणि तेथील निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य ही त्यांना भुरळ घालते आहे. या ठिकाणी आलेल्या अनेक पर्यटकांना येथील अनुभव हा 'डर के आगे ही जित है ! ' असा वाटतो.
🌄
यामुळे दर वेळेस येथे भ्रमंतीसाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढतच चालली आहे. त्या अनुषंगाने याठिकाणीचे पर्यटन फुलवण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळ व वनविभागाने रस्ता तसेच पर्यटन विषयक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे मत पर्यटकाकडून व्यक्त होते. या स्थळाचा पर्यटन दृष्टीने विकास साधल्यास सरकारलाही चांगले उत्पन्नाचे स्रोत निर्माण होईल. व या मागास भागांचा विकासही आपसूकच घडून येईल.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने