अतिवृष्‍टीमुळे चांदसुर्ला गावात घरांमध्‍ये पाणी घुसले #chandrapur

आ. मुनगंटीवार यांनी ताबडतोब कारवाई केल्‍याने नागरिक समाधानी
चंद्रपूर:- तालुक्‍यातील अनेक गावांमध्‍ये अतिवृष्‍टीमुळे बरेच नुकसान झाले. त्‍यातीलच एक चांदसुर्ला या गावात अचानक पाणी आल्‍याने या गावातील शेतांमध्‍ये व घरांमध्‍ये पाणी घुसले. यामुळे येथील नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. ही बाब या क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांना कळल्‍यावर त्‍यांनी आपल्‍या स्‍वीय सहाय्यक व विशेष कार्यकारी अधिकारी यांना जागेवर पाठवून परिस्‍थीती नियंत्रणात आणण्‍यासाठी कारवाई करण्‍याचे निर्देश दिले.

त्‍यानुसार जागेवर जावून सर्व परिस्‍थीतीचा आढावा त्‍यांनी घेतला तेव्‍हा असे लक्षात आले की वेकोलिच्‍या ओव्‍हरबर्डनमुळे हे पाणी गावात घुसते. त्‍यामुळे तिथे दोन मोठे नाले काढून एक नदीकडे व दुसरा मोठया नाल्‍याकडे वळती करावे असे निर्देश तिथे उपस्थित वेकोलि अधिका-यांना दिले.
यावेळी वेकोलिचे खाण प्रबंधक श्री. मोहपात्रा, चंद्रपूर महाऔष्‍णीक विद्युत केंद्राचे अधिकारी महेश गौरी, भाजयुमोचे प्रदेश सचिव अनिल डोंगरे, सरपंच सौ. संगीता हेलवडे, उपसरपंच माधुरी सागोरे, अर्जुन नागरकर, संदीप ढोमणे तथा गावातील नागरिक व शेतकरीवर्ग मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित वेकोलि अधिका-यांनी पाऊस थांबल्‍याबरोबर हे काम करण्‍याचे आश्‍वासन दिले. तसेच महाऔष्‍णीक विद्युत केंद्राच्‍या अधिका-यांनी सुध्‍दा सर्वतोपरि मदत करण्‍याचे आश्‍वासन याप्रसंगी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत