💻

💻

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी केली पूरग्रस्त भटाळी गावाची पाहणी #chandrapur

चंद्रपूर:- दि. 12 जुलै रोजी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी चंद्रपूर तालुक्यातील भटाळी (पायली) या गावाच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
मागील सहा दिवसापासून संततधार पाऊस सुरु असल्याने सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास गावालगत असलेल्या वेकोलीने उभे केलेल्या मातीच्या ढिगाऱ्यामुळे (OB) पाऊसाचे पाणी भटाळी (पायली) गावात शिरले. त्यामुळे परीसरातील शेतशिवारासह गावामध्ये पाणी शिरले. यामुळे गावकऱ्यांच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले तसेच शेत पिकांचेही नुकसान झाले. त्याअनुषंगाने भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी भटाळी (पायली) गावाला भेट दिली व स्थानिक लोकप्रतिनिधींसह वेकोलीच्या अधिकारी व गावकऱ्यांसह नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. या परिसराच्या संपूर्ण पूरग्रस्त भागाचा आढावा घेत गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या व वेकोलीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना व तहसीलदार यांच्याशी भ्रमणध्वनीवर चर्चा करून या भागाचा सर्वे करत नुकसान भरपाई देण्याची मागणी केली.
यावेळी, भाजयुमोचे प्रदेश सचिव अनिल डोंगरे, सरपंच राकेश गौरकर, सुभाष गौरकर, उपसरपंच किसन उपरे, सचिव हर्षवर्धन उपरे यांचेसह वेकोलीचे अधिकारी व गावकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत