💻

💻

माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी केली पूरग्रस्त भागाची पाहणी #chandrapur


चंद्रपूर:- चंद्रपूर मध्ये सर्वत्र पाऊस सुरू असल्यामुळे इरई धरणाचे सात दारे उघडण्यात आले आहे. तरी नदीकाठी असलेल्या भागांमध्ये रहेमत नगर, सिस्टर कॉलनी, हवेली गार्डन, नीरज कॉलनी, उमाटे लेआउट, टक्कर कॉलनी जागोजागी पाणी साचल्याने बुधवारी माजी उपमहापौर राहुल पावडे यांनी या परिसराची पाहणी केली.
तसेच तेथील नागरिकांच्या भेट घेऊन त्यांना काही अडचण असल्यास सांगावे व त्यांची व्यवस्थाच्या दृष्टीने विचारपूस करून त्यांना योग्य ते व्यवस्था पुरवली जाईल असे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत