Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

अतिवृष्टीमुळे पोंभूर्णा तालुक्यात अंशतः ५२ घरांची पडझड #chandrapur #pombhurna


१ जूनपासून १३ जुलैपर्यंत ३६१.२ मि.मि. पावसाची नोंद

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
पोंभूर्णा:- तालुक्यात गेल्या चार दिवसापासून सततधार पावसाने कहर केला असून. ५२ घराची अंशतः पडझड झाली आहे.मात्र सध्यातरी तालुक्यात पूरपरिस्थिती नसली तरी तालुका प्रशासनाने कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्याची सुचना दिली आहे.
चार दिवसापासून तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता.यात अनेक घरांची पडझड झाली असून अंशतः ५२ घरांची यावेळी पडझड झाली.यात एका गोठ्याचा समावेश आहे. पोंभूर्णा तालुक्यात १ जुनपासून बुधवारपर्यंत ३६१.२ मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातून अंधारी व वैनगंगा नदी वाहते. नदींचे पात्र थडी भरून वाहत असले तरी सध्या तरी तालुक्यात पूर परिस्थिती नाही.
बुधवारला दुपारी गोसेखुर्द धरणाचे ३३ दरवाजे उघडण्यात आले असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा तालुका प्रशासनाने दिला आहे. प्रामुख्याने गंगापूर, गंगापूर ,देवाडा बुद्रुक, जुनगाव,ठाणेवासना, घाटकुळ या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या तरी तालुक्यात व गावात पोहचण्याचे मार्ग सूरु आहेत. मात्र गोसेखुर्द पाण्याचा विसर्ग वाढल्यास काही गावांना फटका बसू शकतो त्यामुळे. नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. ✅
तसेच तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, पोलिस पाटलांना याबाबत लगेच माहिती देण्याची सुचनाही देण्यात आले आहे. खबरदारी म्हणून स्थानिक पातळीवरचे पट्टीचे पोहणारे, नावाडी यांचीही मदत प्रशासन घेणार असून. सध्या तहसील कार्यालयात लाईफ जॅकेट,रिंग्स वा बचावाचे आदी साहित्य उपलब्ध आहेत. त्यामुळे अतिवृष्टी व पुर परस्थितीचा सामना करण्यासाठी तालुका प्रशासन सज्ज आहे.
चार दिवसाच्या संततधार पावसामुळे ५२ घराची पडझड झाली आहे.पडझड घरांचे मोका पंचनामे करणे सुरू आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून अनुचित घटना घडू नये यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.
शुभांगी कनवाडे,
तहसीलदार,पोंभूर्णा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत