माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांना पडोली पोलीस ठाण्याच्या नवीन इमारत बांधकामाकरिता निधीची मागणी #chandrapur


चंद्रपूर:- पडोली पोलीस ठाण्याला मंजुरी मिळून सात ते आठ वर्ष झाले असून या कार्यरत असलेल्या पडोली पोलीस ठाण्याची इमारत छोटी असून पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावकऱ्यांना हि इमारत अपुरी पडून नागरिकांची गैरसोय होत असतात. आ. सुधीर यांना अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र राज्य यांचे निवेदनातून नवीन सुसज्ज इमारत बांधकाम निधीची मागणी केली असता आ. सुधीर यांनी तात्काळ माननीय मुख्यमंत्री साहेब मा.उपमुख्यमंत्री साहेब मा.पोलीस महासंचालक व संबंधित मंत्र्यांना आपल्या पत्रातून निधीची मागणी केली. तसेच तसेच या कामाला लवकरात लवकर निधी मिळवून देणार असा विश्वास दिला. या मागणीचे निवेदन श्री अनिल डोंगरे यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब मा.पोलीस अधीक्षक साहेब यांनाही देण्यात आले यावेळी श्री नामदेवजी डाहुले जिल्हा महामंत्री भाजपा श्री विजय मासिरकर श्री.राकेश गौरकार हे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत