💻

💻

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष राहुल सूर्यवंशी यांनी दिली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवाडा येथे भेट #chandrapur


राहुल सूर्यवंशी यांच्या पुढाकाराने शाळेला उपलब्ध करून दिले सॅनिटरी पॅड
(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुका अंतर्गत देवाडा गावमध्ये माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली (जिल्हा उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर) युवा नेते राहुल सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवाडा येथे भेट दिली.
शाळेत गेल्यानंतर तेथील शिक्षकांनी शाळेतील काही समस्या सांगितल्या. अनेक मुली राहत असतात. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक आहे. या सर्व गरीब मुलींसाठी सॅनिटरी पॅड शाळेमध्ये आवश्यक आहे. या करीता आपण पाठपुरावा करावा अशी विनंती शाळेतील शिक्षकांनी केली. तेव्हा राहुल सूर्यवंशी यांनी लगेच सरकारी रुग्णालय देवाडा येथे विपिनकुमार सरांना कॉल केला. त्यांना याबाबत माहिती दिली. त्यांनी लगेच सॅनिटरी पॅड उपलब्ध करून दिले. अवघ्या काही वेळातच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवाडा यांना सॅनिटरी पॅड सुपूर्त करण्यात आले. शाळेच्या शिक्षकांनी व विद्यार्थीनी राहुल सुर्यवंशी यांचे आभार मानले.
यावेळी उपस्थितीत मवीन जल्लावार, साईकिरण कोटावार, प्रवीण मुशमवार, अविनाश सूर्यवंशी, रंजीत मुद्दलवार, व शाळेतील सर्व महिला शिक्षकवृंद उपस्थित होत्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत