Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास अटक #chandrapur


चंद्रपूर:- दहावीच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकास रामनगर पोलिसांनी कलम 354 पोस्को, ॲट्रॉसिटी ॲक्ट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अभिजीत मधुकर रागिट (36) असे अटकेतील शिक्षकाचे नाव आहे.
पीडित विद्यार्थिनी शहरातील एका नामांकित विद्यालयात शिक्षण घेत आहे. मागील एक महिन्यापासून शिक्षक तिचा विनयभंग करत होता. शेवटी सततच्या त्रासाला कंटाळून पीडित मुलीने रामनगर पोलीस स्टेशन गाठून बुधवारी शिक्षकाविरुद्ध तक्रार केली.
त्यानुसार रामनगर पोलिसांनी कलम 354 पोस्को ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करून अभिजीत रागीट यास अटक केली. त्याला गुरुवारी पहाटे अटक करण्यात आली. त्याच्या छातीत दुखू लागल्याने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. वैद्यकीय कारणांमुळे त्याला गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात आले नाही, असे रामनगर पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने या प्रकरणाची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. पुढील तपास चंद्रपूरचे एसडीपीओ सुधीर नंदनवार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत