त्या रस्त्यावरील खड्डे बुजवा #chandrapur

Bhairav Diwase

भाजयुमो सरचिटणीस सुनील डोंगरे यांची मागणी

महानगर भाजयुमोचे मनपाला निवेदन
चंद्रपूर:- तुकूम येथील एस. टी. वर्क शॉप ते बी.जे.एम. कारमेल अकॅडमी ते अयप्पा मंदीर पर्यंतच्या रस्त्यावर असंख्य खड्डे पडले आहेत.हे खड्डे त्वरित बुजविण्यात यावे अशी मागणी भाजयुमो महासचिव सुनील डोंगरे यांनी केली असून यासंदर्भातील निवेदन मनपा आयुक्तांना गुरुवार 21 जुलैला महानगर भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे देण्यात आले.
यावेळी भाजयुमो युवानेते सुशांत अक्केवार, सुमित भोजेकेर,स्वप्नील फाळके, अभि काळे व अमित तिवस्कर याची उपस्थिती होती.