चंद्रपूर:- अतिवृष्टीने जिल्ह्यातील चंद्रपूर शहरातील राजीव गांधी नगर येथील आझाद चौक झोपडपट्टीतील नागरिकांचे घरांची पडझड होऊन जनजीवन विस्कळीत झाले.
तेथील नागरिकांनी आकाश मस्के भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला व आकाश मस्के यांनी क्षणाचाही विलंब न करता भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष मंगेशजी गुलवाडे व ब्रिजभूषण भाऊ पाझारे भाजपा महामंत्री महानगर आणि प्रकाशभाऊ धारणे भाजपा कोषाध्यक्ष यांच्याशी संपर्क साधला व तेथील नुकसानग्रस्त लोकांच्या घराची पाहणी करून प्रशासनाला पंचनामा करून घेतला व नुकसानग्रस्त लोकांना लोकनेते आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून ताडपत्री व अनाज किराणा किट वाटप करण्यात येत आहे. आज नुकसानग्रस्त नागरिकांना या साहित्याचे वाटप करण्यात आले.
वाटप करताना भाजपा बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष दिनकरजी सोमलकर, माजी नगरसेवक जयश्रीताई जुमडे, भाजपा महानगर सचिव सौ सारिकाताई संदुरकर, भाजपा महानगर सचिव रामकुमार आकापलिवार, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोज पोतराजे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा पप्पु बोपचे, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सचिव आशिष ताजने, गौरव चौधरी ईश्वर मंगळ मनोज बुरटकर ,बालाजी जाधव, गणेश कुडे संदिप मस्के आदींची उपस्थिती होती.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत