Top News

"त्या" विद्युत शॉकने मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियांना भाजपचा पाठिंबा #gondpipari


गोंडपिपरी:- काल दि. १६जुलै रोजी सकमूर गावातील एका शेतकऱ्याचा विद्युत प्रवाहने मृत्यू झाला. सदर मयत राजेश्वर तोहगाव करानी दि.१५मार्च २०२२रोजी कणिस्ट अभियंता धाबा यांच्याकडे ट्रान्सफर्मर बदलवून देणेबाबक्त आणि दोन ते तीन पोल वाकलेले सरळ करणेबाबत अर्ज दिले होते. पण सदर दिलेल्या अर्जाची दखल महावितरनाच्या कोणत्याही कर्मचारी किंवा पदाधिकाऱ्यांकडून घेण्यात आली नाही. त्यादरम्यान काल राजेश्वर तोहोगावकर हे काही कामानिमित्य आपल्या शेतीत गेले असता, जिवंत विद्युत प्रवाहाणे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.आणि सदर मयत इस्माची दखल भाजप च्या कार्यकर्त्यांनी केली. माजी जि. प. अध्यक्ष देवरावदादा भोंगळे,माजी जि. प. सदस्य अमरदादा बोडलावर,भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते बबन निकोडे, संतोष मुग्गलकार, दीपक सातपुते ह्या सर्वांच्या मागणीला मयत इसमाबद्दल यश आलेले दिसून येत आहे. आणि महावितरण विभागाच्या कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांबद्दल सदर घडलेल्या घटनेचा प्रित्यर्थ महावितरणकडून नुकसान भरपाई ची अपेक्षा मृताच्या कुटुंबियांना करून देण्याची हमी पण भाजप कार्यकर्ते तसेच पदाधिकारी आणि समस्त सकमूर ग्रामस्थांच्या मागणीनुसार करण्यात आली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने