कोरपना:- तालुक्यातील मोठी नगर परिषद म्हणून ओळख असलेले गडचांदूर शहर मात्र समस्या चे माहेरघर बनले आहे वार्डावार्डातील रस्त्यांची ची अवस्था चीखलमय झाली असून खड्डे इतके झाले आहेत की रस्ता शोधणे अवघड झाले आहे. खड्यात पाणी साचल्या मुळे पायी चालणाऱ्या व बाईक ने ये जा करणाऱ्या माणसांना सुद्धा अवघड झाले आहे.
हा रस्ता आहे प्रभाग क्र.6 लालबहादूर शास्त्री शाळेच्या मागे डोहे-भोजेकर ले आउट येथील आहे पण नगर परिषद मात्र कमालीचे दुर्लक्ष करीत आहे त्यात दूचाकी वाहनास व पायदळ चालनाऱ्याना तर तारेवरची कसरत करावी लागते खड्डे भरपूर झाल्यामुळे कोणता खड्डा चुकवावा हे समजण्यास अवघड झाले आहे खड्डे युक्त रस्त्यावर चिखल येवढे झाले की रस्ता दिसेनासा झाला आहे.
नगर परिषद प्रशासन व नगर सेवक कधी लक्ष देणार की नाही? असा प्रश्न वॉर्डातील रहिवासी करीत आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत