घुग्घुस भाजपातर्फे नव्या राष्ट्रपतीच्या विजयाचा जल्लोष #chandrapur


भाजपाने नेहमी आदिवासी समाजाला न्याय दिला:- देवराव भोंगळे
चंद्रपूर:- गुरुवारी, येथील गांधी चौकात घुग्घुस भाजपातर्फे भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत झारखंडच्या माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू यांनी देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून प्रचंड मताधिक्याने विजय मिळविला.
याप्रसंगी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच आदिवासी बांधवांना व नागरिकांना लड्डू वाटप करण्यात आले.
मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, देशाचे राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांचा प्रचंड मतांनी विजय झाला आहे. हे वर्ष भारत देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणून साजरा करण्यात येत आहे. या महोत्सवात तळागळातील आदिवासी महिला द्रौपदी मुर्मू ज्यांनी संपूर्ण जीवन समाजाच्या सेवेसाठी अर्पण केले. अश्या आदिवासी महिलेला देशाच्या राष्ट्रपती म्हणून बहुमान मिळवून देण्याचे काम देशाच्या नरेंद्र मोदी सरकारने केले आहे. भाजपाने नेहमी आदिवासी समाजाला न्याय दिला. परंतु आता पर्यंत काँग्रेसने कधीही आदिवासी समाजाला संधी दिली नाही. आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी पहिल्यादा देशाचे सर्वोच्च पद द्रौपदी मुर्मू यांना दिले. मी सर्व आदिवासी बांधवांचे अभिनंदन करतो व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अभिनंदन करतो व महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा देतो.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, विनोद चौधरी, अमोल थेरे, सिनू इसारप, रत्नेश सिंग, बबलू सातपुते, श्रीकांत सावे, तुलसीदास ढवस, मंदेश्वर पेंदोर, शरद गेडाम, मानस सिंग, हेमंत पाझारे, उमेश दडमल, निरंजन डंभारे, निरंजन नगराळे, गुड्डू तिवारी, विनोद जंजर्ला, दिलीप कांबळे, गणेश खुटेमाटे, कोमल ठाकरे, असगर खान, अनुप जोगी, हेमंतकुमार, पुंडलिक खनके व मोठया संख्येत भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत