💻

💻

स्वयंशिस्त आणि रोखठोक शैलीचे गतिमान नेते अजितदादा पवार !मुंबई- विधिमंडळ सभागृह असो वा राज्याच्या राजकारणाचा आखाडा असो, आपल्या स्वयंशिस्त आणि रोखठोकशैलीने आपले वेगळे स्थान निर्माण करणारे गतिमान नेते म्हणूनच उभा महाराष्ट्र अजितदादा पवार यांच्याकडे पाहतो. समोर आलेल्या विषयाच्या मुळाशी पोहोचणे, त्यावर अभ्यास करुन स्वतःचे मत बनविणे आणि त्या मतावर रोखठोक भूमिका घेवून ठाम राहणे,हा त्यांच्या राजकारण आणि कार्यपद्धतीचा शिरस्ता! त्यामुळे प्रशासनावर जबरदस्त पकड आणि कार्यकर्त्यांत प्रचंड दबदबा असलेला नेता म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जाते. शरद पवारांना राजकीय दैवतस्थळी राखून वाटचाल करणारे दादा फटकळ वाटत असले तरी ते कमालीचे संवेदनशील आणि हळव्या मनाचे असल्याचा अनुभव महाराष्ट्राने अनेक प्रसंगातून घेतला आहे.पहाटेच्या शपथविधीचा अफलातून इतिहास घडविणाऱ्या या आक्रमक नेत्याचा २२ जुलै हा वाढदिवस. अजितदादांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

श्री. राजा माने
संपादक, राजकीय विश्लेषक, माध्यम तज्ज्ञ.
अध्यक्ष, डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र, मुंबई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत