Top News

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट निवडणुकीकरिता पदवीधर मतदारसंघातून गुरुदास कामडी यांचा अर्ज सादर #chandrapur


चंद्रपूर:- दिनांक २१ ऑगस्ट २०२२ रोजी होऊ घातलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या (सिनेट) अधिसभा निवडणुकी करिता नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद -शिक्षण मंचचे अधिकृत उमेदवार गुरुदास कामडी यांनी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा आशीर्वाद घेऊन व मार्गदर्शनात दिनांक २९ जुलै २०२२ ला मा. आमदार देवरावजी होळी गडचिरोली, भाजपा जिल्हा महामंत्री राजेंद्रजी गांधी , गोविंदजी सारडा, अ.भा.वि.प.चे प्रदेश अध्यक्ष प्रा.योगेशजी येनारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भटक्या विमुक्त (VJ/NT) प्रवर्गातूनआपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांच्याकडे सादर केला.
गुरुदास कामडी हे भाजपा शिक्षक आघाडीचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष असून यापूर्वी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेटचे सदस्य राहीले आहेत. तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे शारीरिक शिक्षण व क्रीडा बोर्डाचे सदस्य राहिलेले आहेत. पुन्हा एकदा दिनांक २१ऑगस्ट २०२२ रोजी होऊ घातलेल्या सिनेट निवडणुकीकरिता गुरुदास कामडी यांनी आपला उमेदवारी अर्ज आपल्या समर्थकासह सादर केला आहे.
अनुमोक म्हणून राजेंद्रजी गांधी,समिर केने,भाजप शिक्षक आघाडी महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य रंजीव श्रीरामवार, व म.रा.शि.प.चंद्रपूर महानगर जिल्हाध्यक्ष दिवाकर पुद्दटवार तर सुचक म्हणून भाजप शिक्षक आघाडी महानगर जिल्हाध्यक्ष प्रा. अरुणराव राहंगडाले , विजय सराफ, भाजप शिक्षक आघाडी जिल्हा सहसंयोजक श्रीकांत कुमरे,संगिता सराफ यांनी समर्थन केले आहे.
यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद- शिक्षण मंचचे नोंदणीकृत पदवीधर मतदारसंघातील अधिकृत उमेदवार प्रशांत दोंतुलवार, स्वरूप तारगे, यश बांगडे, मनोज भुपाल, डॉ. सागर वजे हे खुल्या प्रवर्गातील तर अनुसूचित जमातीचे जयंत गौरकार अनुसूचित जमातीच्या योगिता पेंदाम , व्ही.जे/ एन.टी.प्रवर्गातून गुरुदास कामडी, ओबीसी मधून प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, महिला राखीव मधून सौ किरण संजय गजपुरे यांनी सुद्धा आपला उमेदवारी अर्ज सादर केला.
उमेदवारी अर्ज सादर करताना प्रामुख्याने अनिल पोहनकर, प्रशांत भृगुवार, संदीप लांजेवार, हर्षल गेडाम ,अंकुश कुनघाडकर गडचिरोली, तनय देशकर ,प्रा.अशोक सालोडकर साकेत भानारकर, प्रा. सुयोग बाळबुद्धे ब्रह्मपुरी जगदीश तोटावर वरोरा ,दिवाकर पुद्दटवार, विजय सराफ, श्रीकांत कुमरे , शुभम दयालवार , कुणाल गुंडावार, अक्षय मंगरूळकर ,चंद्रपूर हे प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने