Click Here...👇👇👇

वीज पडून ४ महिलांचा जागीच मृत्यू #death

Bhairav Diwase

वरोरा:- वरोरा तालुक्यामध्ये येत असलेल्या वायगाव भोयर येथे आज ४ वाजताच्या सुमारास महीलांवर वीज पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
  सविस्तर असे की, शेतात काम करीत असताना आज ४ वाजता वायगाव येथील शेत शिवारात परिसरात जोरदार पाऊस व वीजेच्या कडकडाटासह हजेरी लावली. यात शेतात काम करीत असताना महिलाने झाडाचा आधर घेतला. पण त्याच झाडावर वीज कोसळल्याने महिलांचा जागीच मृत्यू झाला.
यात मृतकाचे नाव हिरावती शालिक झाडे (४५ वर्ष), पार्वता रमेश झाडे (६० वर्ष), मधुमती सुरेश झाडे (२० वर्ष), रीना नामदेव गजभे (२० वर्ष) अशा चार महिलांचा जागीच मृत्यू झाला.
याची माहिती शेगाव पोलीस स्टेशन दिला असता येथील ठाणेदार अविनाश मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील पंचनामा स्टेशन चे psi प्रवीण जाधव, किशोर पिरके, महादेव सरोदे कर्मचारी करीत आहे. मृतक महिलांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तात्काळ देण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.