कराटे स्पर्धेत पटकाविले ३ पदक; १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य पदकांचा समावेश
चंद्रपूर:- कराटेचे भीष्म पितामह दाई सेन्साई डॉ. मोसेस तिलक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नेहरू युवा केंद्र चंद्रपूर व एलन तिलक शितोया कराटे स्कूल यांच्या संयुक्त वतीने मोसेस कप २०२२ नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन २४ जुलैपासून स्थानिक अभिषेक मंगल कार्यालयात करण्यात आले होते.
नॅशनल ओपन कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील पलक शर्मा हिने ३ पदक मिळवून दमदार अशी कामगिरी केली. या पदकात १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य पदकांचा समावेश आहे. पलक शर्मा हि सरदार पटेल महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम वर्षाच शिक्षण घेत आहेत. व सरदार पटेल महाविद्यालयात कराटे प्रशिक्षण वर्ग घेत असते.
या विजयाचे श्रेय सेंसाई रामटेके सर, सेंसाई नगराळे सर, सरदार पटेल महाविद्यालय प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख डॉ. विजय सोमकुंवर तसेच आई-वडील व परीवाराला दिले आहे.
आधार न्युज नेटवर्क टिम तर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत