Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

कोराडी नाल्यात आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह #death(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाने आणि वर्धा अप्पर धरणाचे अनेक दरवाजे उघडल्याने भद्रावती तालुक्यातील महापूर आता ओसरु लागला असून तालुक्यातील कोराडी नाल्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे.
आज दि.२१ जुलै रोजी अनेक नाल्यातील पाणी कमी झाले, तर अनेक बंद रस्ते सुरू झाले. दरम्यान, सकाळी तालुक्यातील माजरी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नागलोनजवळील कोराडी नाल्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच माजरी पोलिस घटनास्थळी गेले व त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.
  सदर इसम अंदाजे ५० ते ५५ वर्षे वयाचा असून अंगात फिक्कट गुलाबी रंगाचा चेकचा शर्ट, निळा पॅन्ट आणि फुल बाह्यांची बनियान  परिधान केलेला आहे. सदर इसम सळपातळ बांधा, हलकी मिशी, दाढी व केस पिकलेले, अर्धे टक्कल पडलेले अशा वर्णनाचा आहे. पुराच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला आहे. सदर इसम कोणाचा नातेवाईक असल्यास त्यांनी माजरी पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत