नवी दिल्ली:- राष्ट्रपती निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला आहे. यामध्ये एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मोठ्या प्रमाणावर मतदान झाले आहे. मुर्मू यांनी युपीएचे यशवंत सिन्हा यांच्यावर आघाडी घेतली आहे.द्रौपदी मुर्मू यांना खासदारांची ५४० मते मिळाली आहेत. तर सिन्हा यांना २०८ मते मिळाली आहेत. मुर्मू यांना मिळालेल्या मतांची व्हॅल्यू 3,78,000 तर सिन्हा यांना मिळालेल्या मतांचे मुल्य 1,45,600 एवढे होत आहे.
एनडीएकडे असलेल्या खासदारांच्या संख्येपेक्षा जास्त मते मुर्मू यांना मिळाली आहेत. यामुळे विरोधकांची मते फुटल्याचे सध्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. आता विविध राज्यांच्या आमदारांच्या मतांची मोजणी सुरु होणार आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत