Top News

भद्रावती तालुका दुष्काळ ग्रस्त घोषित करा::-राष्ट्रवादी कॉंग्रेस ची मागणी #chandrapur #bhadrawati

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती तालुका प्रतिनिधी चंद्रपुर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे ३३९ घरांची पडझडीने नुकसान झाले. त्यासोबतच भद्रावती तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आली असून अनेकांची पिके वाहून गेली आहेत. जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. त्वरित पंचनामे करून शेती, पडझडीने घरांचे नुकसान, मनुष्य व पशुधन हानीची नुकसान भरपाई देण्याची लोकहितकारी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टिचे प्रदेश प्रतिनिधि मुनाज शेख, तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर यांच्या नेतृत्वात भद्रावती राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ने तहसीलदार मार्फत निवेदन देवुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
कोरोना नंतर समाजाची स्थिती सावरण्यास सुरुवात झाली होती. मात्र आता पुरस्थितीमुळे आणखी मोठे संकट निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून बी बियाणे खरेदी केले होते. मात्र - पुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीतील लागवड केलेली पिके हि वाहून गेली. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. परंतु कर्जाचा पैसा हा शेतीत लावल्याने आता करायचे काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना या संकटात आधार देण्याची राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी प्रदेश प्रतिनिधि मुनाज शेख तालुका अध्यक्ष सुधाकर रोहनकर सामाजिक न्याय विभाग शहर अध्यक्ष पनवेल शेंडे, संतोष वास्मवार, आशीष लिपटे यांनी तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.निवेदन नायब तहसीलदार भांदकर साहेब यानी स्विकीरले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने