मुल:- चंद्रपूर जिल्ह्यातील गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग अंधारी नदीच्या पुरामुळे ठप्प झालाय. या महामार्गावर दोन्ही बाजूला पोलिसांचा बंदोबस्त असताना एका इसमाने पुलावरुन चालत-चालत सहज पूर ओलांडण्याचा प्रयत्न केला. दुसर्या टोकावर आल्यावर पोलिसांनी कारण विचारले. उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला दंडुक्याचा प्रसाद दिला.
जिल्ह्यात गेले दहा दिवस प्रचंड अतिवृष्टी सुरू आहे. असे जीव धोक्यात घालून पुरातून प्रवास करणे धोकादायक असल्याचे आवाहन सतत केले जात आहे. मात्र तरीही याला न जुमानता नागरिक अकारण पूर ओलांडत आहेत. अंधारी नदीवरील पूल पार करणाऱ्या या इसमाला मात्र पोलिसांनी अद्यल घडवली.