Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

शेतीच्या वादातून डोक्यावर फावड्याने वार करत हत्या #murder


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
गडचिरोली:- दोन व्यक्तींच्या विवाद थेट मारहाणीत होत एका व्यक्तीने दुस-यावर फावड्याने वार करुन हत्या केल्याची घटना ४ जुलै रोजी मंगळवारी शहरापासून जवळच असलेल्या पुलखल येथे उघडकीस आली. हत्येनंतर सदर आरोपीने थेट गडचिरोली पोलीस ठाणे गाठीत आत्मसमर्पण केले. नरेश गेडेकर (रा. पुलखत) असे आरोपीचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार पुलखल येथील कैलास मेश्राम व नरेश गेडेकर यांच्यामध्ये शेतातच वादविवाद सुरु झाला. विवादाचे पर्यावसन हाणामारीपर्यंत गेल्याने आक्रमक झालेल्या नरेशने हातातील फावड्याने कैलासच्या डोक्यावर वार केला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हत्या घडवून आणल्यानंतर नरेश गेडेकर याने स्वत: गडचिरोली पोलीस ठाणे गाठीत स्वत:ला पोलिसांच्या स्वाधिन केले.
गडचिरोली पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत घटनास्थळ गाठले. मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत