💻

💻

स्व. संजय कंडलेवार यांच्या परिवाराला आर्थिक साहाय्यताचा धनादेश वाटप #Rajura


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा  
राजुरा:- स्व. संजय राजाराम कंडलेवार वय 50 वर्ष रा नोकारी बु हा व्यक्ती दिनांक 10/7/2022 रोजी सकाळी 9 वाजता नोकारी बु.(माईंस) ता. राजुरा येथील नाल्याच्या प्रवाहात वाहून गेला व शोध घेतला असता दी.13/07/2022 ला मृतदेह अमलणाला धरण येथे तरंगताना आढळून आला होता
मयताच्या परिवाराला आर्थिक साहाय्यताचा धनादेश देण्यासाठी हरीश गाडे साहेब तहसीलदार राजुरा हे नोकारी बु.(गोवारीगुडा) येथे मयत संजय/संजीत यांचे पीवाराला भेट देउन रू. चार लाखाचा धनादेश देण्यात आला. 
       
यावेळी श्री. साळवे साहेब  मंडळ अधिकारी, श्री. वडस्कर साहेब  तलाठी ईसापुर, वामन तुरानकर  माजी ऊपसरपंच  नोकारी बु राकेश  भगत पो.पाटील  नोकारी बु.रमेश नैताम  कोतवाल ईसापुर हे उपस्थित  होते.  
मयताचा परिवार दुखात  असताना मा.तहसीलदार  साहेब  यानी व महसुल विभागाचे कर्मचारी ,पोलीस स्टेशन गडचांदूर,  पो.स्टेशन चंद्रपूर शोध पथक, श्री.डोईफोडे सर, ग्रामस्थ यानी केलेले सहकार्य अमूल्य आहे  व वामन तुरानकर माजी उपसरपंच यानी  केलेला पाठपुरावा व मदत यामुळे सर्व शक्य  झाले असे सांगण्यात आले. व सर्वांचे धन्यवाद मानण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत