जिवती तालुका सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा #chandrapur #Jivati

Bhairav Diwase
कृष्णा चव्हाण यांचे जिवती तहसिलदारांना निवेदन
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- तालुका ओला दुष्काळ जाहीर करा. असे मागणी कृष्णा गंगाराम चव्हाण विदर्भ सचिव बंजारा समाज भाईचारा समिती आर. पी.आय यांच्याकडुन मा.एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई द्वारा, मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर मार्फत. मा.तहसीलदार साहेब तहसील कार्यालय जिवती.यांचा द्वारे निवेदन पाठविण्यात आले.

या अतिवृष्टीच्या अती पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिंकांची अतोनात नुकसान झालेली असून शेतऱ्यांना एकरी 25.000 हजार रुपये दया. शेतकऱ्यांचे तात्काळ मोका पंचनामे करून आर्थिक मदत देण्यात यावी.संततधार पावसाने पिकांचे अतोनात नुकसान जिवती पहाडावरील अनेक गावातील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.शेतकऱ्यांचे शेती पिकासह पुर्णत:जमीन खरडून वाहून गेल्याने शेतकऱ्यांना प्रति एकर 25.000 हजार रुपये नुकसान भरपाई शासनाने दयावी.सततधार पावसामुळे कुडामातीचे असलेले त्यांचे घर भर पावसात कोसळल्याने त्या कुंटूबाला आता राहायचे कुठे? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
घरात असलेले संसार उपयोगी साहित्य भिजले.प्रशासनाने तत्काळ लक्ष देत त्या कुंटूबाना राहाण्या सोय करून आर्थिक मदत देण्यात यावी.आमच्या मागण्या खालील प्रमाणे आहे.१)जिवती तालुका ओला दुष्काळ जाहीर करा.२)जिवती तालुक्याचा सरसकट शेतकऱ्यांना एकरी २५,००० हजार रुपये दया.३) संपूर्ण जिवती तालुक्यातील सरसकट कर्ज मुक्त करा.४)जिवती तालुक्यात अतिक्रमन धारकांना पट्टे दया.५)जिवती तालुक्यात संपूर्ण शेतकऱ्यांना १०० झाडे वाचवण्याकरिता रोजगार हमी योजना तर्फे त्यांना मानधन दया.६)संपूर्ण जिवती तालुक्यात तेलंगणा सारखं शेतकऱ्यांना थ्री.फेज सरकट वीज फुकट दया.असे मागणी मा.कृष्णा गंगाराम चव्हाण विदर्भ सचिव बंजारा समाज भाईचारा समिती, आर.पी.आय तसेच शेतकरी जिवती तालुका महिला सचिव रजिया शेख , विठल जाधव,प्रभू पवार ,शिवाजी चव्हाण,सुधाकर चव्हाण,परमेश्वर भोगे,नामदेव आडे,वसंत पवार,दत्ता जाधव,गुलाब राठोड,मंगु मडावी,भीमराव राठोड,बाबुराव पवार,उत्तम जाधव,मनोहर सूर्यवंशी ,गणेश राठोड, मरकु वेडमे, जगुबाई कोटणाके,तनुबाई सोयाम, सोमु कुंभरे, रुकमाबाई वेडमे, लचूबाई कोटनाके,भीम बाई करपते, लींगु बाई कोटनाके,तानाजी करपते उपस्थित होते.