Top News

शपथविधी होताच सुधिरभाऊ म्हणाले 'ओ.के' 'डण'...!


ना. सुधिरभाऊंच्या शब्दाने त्या 800 कुटूंबियांना दिलासा!

प्रसार माध्यमांचे प्रयत्न फळाला आले.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात 
मुल:-  मूल शहरातील ८०० 
कुटूंबांना अर्धमेलं करून गेलेल्या पावसाची भिती काही केल्या जात नसताना ,विवीध प्रसार माध्यमांनी सत्य विदारक परिस्थीती पुढे ठेवली. राज्य पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष
मूल निवासी प्रा. महेश पानसे यांच्या सततच्या पाठपुराव्याची दखल घेत ना. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांनी शपथविधी सोहळ्यानंतर लगेच तात्रीक दुरुस्तीच्या मागणीला "ओ.के"
केल्याने भितीच्या सावटाखाली जगणाऱ्या त्या ८०० कुटूंबियांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाऊस येण्याच्या व घरात पाणी घुसण्याच्या कल्पनेनेच अंगावर शहारे येणारी स्थिती मूल शहरात यंदा बघावयास मिळाली.

     काही दिवस वेळ मारून घेण्याचा मनसुबा ठेवून महसूल विभागाने पाच हजाराचा लॉलीपॉप देण्याची मुनारी देवून या वैतागलेल्या कुटूंबियांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले. पण ढग जमले की पुन्हा पाऊस घरात घुसल का जी भाऊ? हा सवाल कायम होता व आहे. मात्र प्रा. महेश पानसे यांनी प्रसार माध्यमातून रोखठोक या सदरातून व प्रत्यक्ष मुलाखतींमधून पाठपुरावा सुरु ठेवला व अखेर मंत्रीपदाची शपथ घेताच याकडे सकारात्मक लक्ष देण्याचा पुढे येऊन शब्द दिल्याने भविष्यात तांत्रीक त्रुटी दुरुस्त्या होऊन दुरगामी दिलासा मिळण्याची शक्यता वाढली आहे. "दिला शब्द केला पूर्ण" यासाठी ना. मुनगंटीवार यांची ख्याती आहेच. तशा सुचना त्यांनी बाधकाम विभाग व न.प. प्रशासनास दिल्याही आहेत.
   
    सरकार स्थापणेनंतर हा जिवघेण्या प्रकाराची आपण वाट
लावू असा शब्द त्यांनी प्रा. महेश पानसे यांना दिला होता व मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता "ओ.के." करून मोठा दिलासच दिला म्हणता येईल.

   महसूल विभागाचा ढिसाळपणा यावेळी बघायला मिळाला आहे. पटवारी किंवा कुठला अधिकारी पंचनामा करायला गेल्याचे व खरे पंचनामे झाल्याचे दिसले नाही. कोतवालाची वारी मात्र ५ हजाराची मुनारी देत भर पावसात फिरताना दिसली. कुणाचे किती नुकसान झाले? कुणाच्या कुटूंबाची, संसाराची काय अवस्था झाली आहे हे जर यांनी जवळून बघीतले असते, तर या ८००
घरच्या माऊल्यांच्या भेदरलेल्या, धास्तावलेल्या नजरा प्रत्यक्ष अनुभवून  यांनाही ५ हजाराचे चनेफुटाने ऑनलाईन द्यायला नक्कीच बरे वाटले नसते. पंधरवाडयानंतरही आथिंक मदत
अजूनही अनेकांना मिळालेली नाही.

    शेकडो घरातील दैनंदिन उपयोगी साहित्याची,  अन्नधान्याची, बांधकामांची, वाहनांची झालेली वाताहत, अवस्था अंगावर शहारे आणणारी आहे व ही भिती कायम मनात बसली म्हणून आता ढग जमले की ...पुन्हां घरात पाणी घुसल का भाऊ म्हणून डायरेक्ट आमदार सुधिरभाऊंना सवाल केला जात होता. नैसर्गीक आपत्तींस शासन जबाबदार नाही असे म्हणायचे नाक अधिकारी व लोकप्रतिनिधींना नाहीच कारण यंदा पावसाने जो घात झाला तो निव्वळ तात्रीक चुकांमूळे, नियोजनाचा अभाव, व दर्जाहीन बांधकामे हिच या मागची प्रमुख कारणे. कुणीतरी समोर येऊन
लवकरात लवकर तांत्रीक चुका दुरूस्त करून भविष्यातील सुरक्षिततेची हमी तर दयायला हवी अशी अपेक्षा व्यक्त होत असताना आता नामदार सुधिरभाऊंनीच पुढे येऊन व शब्द देऊन दिलासा दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने