देशभक्तीवर जय घोषणांनी पिट्टीगुडा व पाटण शहर दुमदुमून निघाले रॅलीला सुरुवात पिट्टीगुडा येथुन करण्यात आली तर पाटण या शहराला वळसा घालुन पोलिस स्टेशन पाटण येथे आल्यानंतर देशभक्तीवर गीत गायणाचा व मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडला या वेळी पिट्टीगुडा पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शरद आवारी माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव पाटील मडावी डाॅ.पंकज पवार माजी उपसरपंच भिमराव पवार सिताराम मडावी पोलिस कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत होते
स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त पिट्टीगुडा व पाटण पोलिसांच्या वतीने भव्य तिरंगा रॅली व्दारे जनजागृती #jiwati
रविवार, ऑगस्ट १४, २०२२