Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

आदर्श शाळेत वृक्ष बियांची दहीहंडी.


नेफडो, राष्ट्रीय हरीत सेना, स्काऊट -गाईड यांचा संयुक्त उपक्रम.
राजुरा:- बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचलित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर व आदर्श हायस्कूल राजुरा येथे वृक्ष बियांची दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, राष्ट्रीय हरित सेना, छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट व सावित्रीबाई गाईड युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्ष बियांची दहीहंडी कार्यक्रम घेण्यात आला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बा. शी. प्र. मं. संस्थेचे अध्यक्ष सतीश धोटे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर साबणानी, सचिव भास्करराव येसेकर, संचालक अविनाश नीवलकर,  मंगला माकोडे, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभूळकर, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संतोष देरकर, राष्ट्रीय कला साहित्य व सांस्कृतिक विकास समितीच्या चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रजनी शर्मा, नेफडोचे चंद्रपूर जिल्हा युवा अध्यक्ष आशिष करमकर, आदर्श प्राथमिक च्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे,  आदर्श हायस्कूल चे मुख्याध्यापक सारिपुत्र जांभुळकर, आशादेवी मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दिपक सातपुते, राष्ट्रीय हरित सेना विभाग प्रमुख बादल बेले, पालक प्रतिनिधी दत्तूजी ढवस, मोतीराम पोटे, सौ. घरोटे, आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.यावेळी आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी मनमोहक असे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त नृत्य सादर केले. 
 वृक्ष लागवड,  पर्यावरण संवर्धना मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या राष्ट्रीय हरित सेनेच्या दहा विद्यार्थ्यांना नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेतर्फे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. विध्यार्थीनी संकलन केलेल्या बियांची दही हंडी फोडण्यात आली. या बियांचे सीडबॉल तयार करून वृक्षारोपण केले जाते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी कांबळे यांनी केले. तर प्रास्ताविक मुख्याध्यापिका नलिनी पिंगे यांनी तर                  आभार प्रदर्शन  रुपेश चिडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था,  राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट गाईड युनिट यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत