Top News

महाराष्ट्र "स्टार्ट अप" यात्रेचे मूल नगरीत आगमन.

नवभारत व कर्मवीर महा. तर्फे स्वागत व मार्गदर्शन.


(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात
मूल:- "ध्यास नाविण्याचा व शोध नव उद्धयोजकांचा" हा नारा देत महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्धयोजकता व नाविण्यता विभागाच्या " महाराष्ट स्टार्ट अप" यात्रेचे मूल नगरीत कर्मवीर महा. चे परिसरात आगमन झाले. नवभारत कनिष्ट विज्ञान महा.व कमंवीर महा.तफै या यात्रेचे जोमात स्वागत करण्यात आले.


महाराष्ट्र शासनातफै प्रत्येक तालुक्यात उद्धयोजकता प्रचार व प्रबोधन, जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण स्पर्धा प्रसार करण्याकरीता "महाराष्ट्र स्टार्ट अप" यात्रेचा शुभारंभ करण्यात आला आहे.
कर्मवीर महाविद्यालयाचे प्रांगनात संपन्न झालेल्या सभेत विद्याथी व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थीत होते. या यात्रेचे समन्वयक आदित्य भागवत व प्रा. महेश पानसे यांनी या यात्रेचे औचित्य व उद्देश यावर मार्गदर्शन केले.
कर्मवीर महाविद्यालयाचे सभागृहात स्वागत व प्रसार सत्रात प्राचार्या डॉ.अनिता वाळके यांनी तर नवभारत कर्मवीर महाविद्यालय तफै प्रा. किसन वासाडे यांनी यात्रेसोबत आलेल्या अधिकाऱ्यांचे स्वागत केले. याप्रसंगी तालुका समन्वयक सुवर्णा थेरे, जिल्हा समन्वयक अमरीश पठाण, यांनी सविस्तर मार्गदर्शन करून विद्यार्थांनी गावागावात प्रचार व प्रसार करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी प्राचार्या डॉ. अनिता वाळके प्रा.डॉ.कऱ्हाडे, प्रा. डॉ. गणेश गायकवाड, प्रा. किसन वासाडे, प्रा. देवानंद मासीरकर, प्रा.धनंजय चुदरी, प्रा. प्रभाकर धोटे, प्रा. डोंगरवार व कर्मवीर महा. चे प्राध्यापकवृंद उपस्थीत होते. या प्रसंगी अनेक शाळा, महाविद्यालय व विदयार्थ्यांची नोंदणी करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने