पोंभूर्णा येथे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0
पोंभुर्णा:- तालुका क्रीडा संकुल समिती पोंभूर्णा, आणि चिंतामणी महाविद्यालय. चिंतामणी कॉलेज ऑफ सायन्स. चिंतामणी कॉलेज ऑफ कॉमर्स पोंभूर्णा. येथील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 ऑगस्ट 2022 रोजी मेजर ध्यानचंद जयंतीनिमित्त "राष्ट्रीय क्रीडा दिवस, महाविद्यालयाच्या वसंत वैभव सभागृहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पठाण सर, प्रमुख अतिथी प्रा. डॉ. सोनोने सर, प्रमुख पाहुणे जयंत टेकाम तालुका क्रीडा संकुल कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक प्रा. संतोष कुमार शर्मा यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवन कार्यावर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना प्रगती करायची असेल तर शिक्षणासोबत खेळणे खूप महत्त्वाचे आहे.तालुका क्रीडा संकुल येथे डॉ. संघपाल नारनवरे श्री जयंत टेकाम. यांच्या मार्गदर्शनात बॅडमिंटनच्या स्पर्धा घेण्यात आल्या. कब्बडी. बॅडमिंटन. बॉल बॅडमिंटन हँडबॉल स्विमिंग खेळाडू यांची उपस्थिती होती. संचालन डॉ. शैलेंद्र गिरीपुंजे तर कार्यक्रमाचे आभार डॉ. संघपाल नारनवरे यांनी केले. सर्व प्राध्यापक तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम सहभागी झाले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)