पुराच्या प्रवाहात बैल जोडी गेली वाहून #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0


पोंभुर्णा तालुक्यातील जुनगाव हे शेवटचे गाव. या गावाला नेहमी पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होत असते. गेल्या ९ ऑगस्ट पासून जुनगाव वैनगंगा नदीच्या पुराच्या वेढ्यात आहे. या पुरामुळे वेळेवर उपचार अभावी एका तरुणाचा १० ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता.
यातच आज शुक्रवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी कुमार मारुती दुधनवार या शेतकऱ्याचे दोन्ही बैल पुरामध्ये वाहून गेल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यावर मोठे संकट कोसळले असून त्याला ताबडतोब शासनाने मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)