चंद्रपूर:- कोळसा भरलेला ट्रक उभा करून चालक चेक पोस्टवर माहिती देण्यासाठी गेला. तेवढ्यात उभा असलेला ट्रक आपोआप पुढे जाऊ लागला. परंतु, काही अंतरावर जावून ट्रक नालीत फसला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. ही घटना चंद्रपूर शहराजवळील नांदगाव भूमिगत कोळसा खाणीजवळ ३० जुलैला दुपारच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, नांदगाव भूमिगत कोळसा खाणीतून कोळसा भरून बाहेर निघालेला ट्रकचा चालक आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून चेक पोस्टवर माहिती देण्यासाठी गेला. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ट्रक उभा केला होतो, तो रस्ता देखील उताराचा होता. यावेळी ट्रकचे गिअर फ्री झाले व ट्रक आपोआप चालकाविना पुढे जाऊ लागला. दूर गेल्यानंतर हा ट्रक जवळच्या नालीत जाऊन अडकला. रस्त्यावर नागरिक होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही,