Top News

आ. मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाला झाले विक्रमी रक्तदान #chandrapur #blooddonation

एकाच दिवशी 1001 युनिट रक्तदान
चंद्रपूर:- तेरा वैभव अमर रहे माँ,हम दिन चार रहे ना रहे ...हे ब्रीद अंगिकारून लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा सामाजिक व राजकीय प्रवास सुरु आहे.3 दशकांपूर्वी रक्तदानाच्या माध्यमातून त्यांनी जनसेवेला सुरवात केली.रक्तदानाची ही परंपरा आजही सुरू आहे.लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनाला 1001 रक्तदात्यांनी रक्तदान केले,हा एक विक्रमच असून रक्तदान देशसेवेचा उत्तम मार्ग आहे. असे प्रतिपादन महानगर भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी केले.ते महानगर भाजपा तर्फे लोकनेते आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या जन्मदिनानिमित्य 5 मंडळात आयोजित भव्य रक्तदान शिबिरात रक्तदात्यांशी संवाद साधताना शनिवार 30 जुलैला बोलत होते.
पूर्व मंडळात 157,पश्चिम मंडळात 170,उत्तर मंडळात सर्वाधिक 312,दक्षिण मंडळात 60 , मध्य मंडळात 237 तर 62 रक्तदात्यांनीं शासकीय रुग्णालयात रक्तदान केले,अशी माहिती 5 मंडळातील रक्तदान शिबिराचे प्रमुख भाजयुमो जिल्हाध्यक्ष(श)विशाल निंबाळकर यांनी दिली.डॉ हेडगेवार रक्तपेढी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या चमूने रक्तसंकलन केले.नांदेड येथील सुप्रसिद्ध डॉ तन्मय बडवाईक यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.डॉ ऋषिकेश कोल्हे,डॉ.सारिका,डॉ सुरेश शर्मा,डॉ सौरभ व डॉ अनुराग वैष्णव यांनी रक्त संकलनसाठी महत्वाची भूमिका बजावली.
यावेळी महानगरातील चंद्रपूर विधानसभा प्रमुख प्रमोद कडू,भाजपा(श)संघटन महामंत्री राजेंद्र गांधी, महामंत्री सुभाष कासनगोट्टवार, ब्रिजभुषण पाझारे,कोषाध्यक्ष प्रकाश धारणे,शिबीर संयोजक- भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर,महानगर उपाध्यक्षा डॉ. भारती दुधाणी,छबू वैरागडे,डॉ किरण देशपांडे तसेच पूर्व मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर,पश्चिम मंडळ अध्यक्ष रवी लोणकर,मध्य मंडळ अध्यक्ष सचिन कोतपल्लीवार,उत्तर मंडळ अध्यक्ष विठ्ठल डुकरे,दक्षिण मंडळ अध्यक्ष संदीप आगलावे यांची उपस्थिती होती.
पूर्व मंडळात 157 युनिट रक्तदान.....
पूर्व मंडळ अध्यक्ष दिनकर सोमलकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या रक्तदान शिबिरात 157 युनिट रक्तदान झाले.यशस्वीतेसाठी संजय पटले,पप्पू बोपचे,जयश्री जुमडे,महेंद्र जुमडे,वंदना जांभुळकर, प्रलय सरकार, बलराम शहा, राम हरणे, गिरधर येडे, चंद्रकला सोयाम, आकाश मस्के, सोनू तुरीले, अनिकेत भरणे, शिवम सिंग, श्याम कुडे, वर्षा सोमलकर, कविता जाधव, नीलिमा आत्राम, नूतन मेश्राम, कविता सरकार,विदेश शहा,दीपक विश्वास, सारिका संदुरकर, धम्मप्रकाश भस्मे, धनराज कोवे, रेखा मळावी, दीपक भट्टाचार्य, विनय जोगेकर, लक्ष्मण दास, विजया जोगेकर, बंगाली कॅम्प मंडळ मित्र परिवार यांनी परिश्रम घेतले.
पश्चिम मंडळात 170 युनिट रक्तदान......
या मंडळात 170 रक्तदात्यांनी रक्तदान केले.रवी लोणकर, डॉक्टर भारतीताई दुधाने, छबुताई वैरागडे, राखीताई कंचर्लावार, राहुल पावडे, रवी असवानी, शितल आत्राम, सविता कांबळे, राकेश बोमनवार, किरण बुटले, सपना ताई नामपल्लीवार, अमित निरंजने, स्वप्निल भोपे य,शुभम शेगमवार, अमोल मते, श्रीकांत देशमुख, लीलावती रविदास, संदीप देशपांडे, राहुल कांबळे, रितेश वर्मा, अमोल उत्तरवार, प्रमोद शिरसागर, अक्षय शेंडे, रोहित भट, अभि वांढरे , जयश्री आत्राम, सिव्हिल लाईन मंडळ मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.

दक्षिण मंडळात 60 युनिट रक्तदान.....

दक्षिण मंडळातील संत रविदास महाराज सभागृह,जुनोना बायपास चौक बाबुपेठ येथे 60 युनिट रक्तदान करण्यात आले. डागा स्मृती शासकीय रूग्णालय ,नागपुरच्या डॉ. सौरभ मुंडले नागपूर, डॉ नागनाथ मोरे, डॉ राहुल भोयर, वर्षा बालपांडे मॅडम, वंदनाताई झाडे, गौरव मोहिते, वासुदेव निकोसे यांनी रक्त संकलन केले.
भाजपा ज्येष्ठ नेते प्रमोदभाऊ कडु, ज्येष्ठ नेते चंद्रशेखर गन्नुवार यांच्या मार्गदर्शनात यशस्वीतेसाठी संदिप आगलावे, शिबिर सहसंयोजक व मंडळ अध्यक्ष , मंडळ महामंत्री आकाश लक्काकुलवार,माजी नगरसेवक प्रदिप किरमे, श्याम कनकम, नगरसेविका सौ ज्योती ताई गेडाम,सौ कल्पनाताई बबुलकर, दशरथ सोनकुसरे, गणेश गेडाम, मुकेश गाडगे, नंदकिशोर गन्नुवार, अशोकराव अशोकराव पुल्लावार,दिवाकर पुद्दटवार,कुणाल गुंडावार, राजेश यादव, विजय मोगरे,हिमांशू गादेवार, आकाश ठुसे , सचिन गन्नुवार,डॉ.प्रमोद रामटेके, मंगेश तामगाडगे,मारोती पारपेल्लीवार, रविंद्र नंदुरकर, राजेंद्र दागमवार, अखिलेश रोहिदास, श्यामराव वनस्कर,दुमदेव मरसकोल्हे, सुभाष ढवस, नंदकिशोर बगुलकर,रघु गुंडला,विजय रामगिरवार, नंदकिशोर येरेकर,देवराव पेंदाम, रेखाताई चन्ने, विद्याताई बाथो, वंदनाताई राधारपवार,ऊरकुडे ताई,व बुथ प्रमुख,शक्ती केंद्र प़मुख,युवा मोर्चा,पेज प्रमुख, महिला आघाडी,इ.नी अथक परिश्रम घेतले.
सर्वाधिक उत्तर मंडळात 312 युनिट रक्तदान.......
मातोश्री विद्यालय तुकुम येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न डॉक्टर हेडगेवार रक्त पेढी व सामान्य रुग्णालय रक्त पेढी तर्फे रक्त संकलन करण्यात आले.येथे सर्वाधिक 312 युनिट रक्तदान झाले.विठ्ठलराव डुकरे, सुभाष कासनगोट्टूवार, संदीप आवारी ,रवी गुरनुले, पुरुषोत्तम सहारे, अमीन शेख, सुनील डोंगरे, गजानन भोयर, चंदन पाल, प्रमोद शास्त्रकार ,श्रीकांत भोयर, रुद्रणारायन तिवारी, राजू गोलीवार, रामपाल सिंग, अंजली घोटेकर,आनंदराव मांदाळे , श्रीधर पेंदोर,दिप्तीकेश निरंजने, स्वप्नील डुकरे, वासुदेव बेले,सतीश तायडे ,जितेंद्र वाकडे, अमोल तंगडपल्लीवर,मुन्ना एलटम ,संजय कोत्तावर, शुभम मेश्राम, रतन दातारकर, अरविंद मडावी,वसंतराव धांदरे,विजय ठाकरे,दिवाकर भट, विनोद ढोक,उमेश गजर,आशिष ताजने, सौ.मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञाताई गंधेवार, गीताताई गेडाम,वंदना संतोषवार, प्रभा गुळध्ये, गीता महाकुलकर, भावना नागोसे, अरुणा चौधरी, आशा देउलकर,रंजना किन्नाके,सीमा मडावी, शीतल गुरनुले, वनिता डुकरे, शिलताई चौहान ,माया उईके ,पुष्पा उराडे यांचे परिश्रम फळाला आले.
मध्य मंडळात 237 युनिट रक्तदान.....

दक्षिण मंडळाच्या पाठोपाठ मध्य मंडळाने 237 युनिट रक्त देऊन बाजी मारली. यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.विशाल निंबाळकर, संजय कंचर्लावार, प्रकाश धारणे, ब्रिजभूषण पाझारे, राजू अडपेवार, राजेंद्र गांधी, शितलताई कुळमेथे, आशा अबोजवार, अंजली घोटेकर, संगीता खांडेकर, राजेंद्र खांडेकर, गणेश रामगुंडावार, सचिन कोतपल्लीवार, बाळू कोलनकर, राजू जोशी, रवि चाहारे, राजू घरोटे, कृष्णा चंदावर, संतोष वडपल्लीवार, रेणुका घोडेस्वार, मनीषा महातव, रंजीता येले, प्रवीण उरकुडे, यश बांगडे, स्नेहीत लांजेवार, राहुल पाल, सुनील हांडे, सागर हांडे, केतन मेहता, नकुल आचार्य, गणेश राजपायले, शिवम कपूर, महेश कोलावार, चांद भाई सय्यद, श्याम बोबडे, निशिकांत महागावकर, प्रणय डंबारे, मोहन मंचलवार, प्रवीण शेट्टीवार, रमेश कोडबुतवार, श्रेयस कातपाल, गौतम नगराळे, अमन वाघ, विपिन बाजार मंडळ मित्रपरिवार यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने