Click Here...👇👇👇

हायवा-ट्रक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश #chandrapur

Bhairav Diwase

सुधीरभाऊचे धाकड शिष्य देवराव भोंगळे हेच युवकांना न्याय देणारे युवानेतृत्व:- श्याम आरकील्ला उपाध्यक्ष, हायवा असोसिएशन
(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात बुधवार, १७ ऑगस्ट रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हायवा-ट्रक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश घेतला.
याप्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी रोशन जैस्वाल, शाम आरकिल्ला, शशी बोंगोनी, कृष्णा शाह, बंटी बघेल, रमेश कोट्टेकोल्ला, रोहित जैस्वाल, सिनू दुर्गम, श्रीधर करंगले, विनोद शर्मा, सचिन साठे, मेघराज लांजेवार, ओम बनकर, राकेश चिट्टाला, विकास तोडासे, विकास चटकी, अजय सहानी, आशिष चिंचोलकर, शिवदत्त यादव, अंकुश गिराम, अनिल सिडाम, अर्जुन गज्जेली या पक्षप्रवेशीतांच्या गळ्यात भाजपाचा दुपट्टा टाकून त्यांचे स्वागत केले.
हे सर्व हायवा-ट्रक असोसिएशनचे पदाधिकारी असून गुप्ता कोल वाशरीत ही असोसिएशन गेल्या अनेक वर्षापासून काम करीत आहे.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, संतोष नुने, रत्नेश सिंग, अमोल थेरे, अजय आमटे, हसन शेख, साजन गोहने, संजय भोंगळे, बबलू सातपुते, शाम आगदारी, भानेश शेट्टी, प्रमोद सिद्दम, कोमल ठाकरे, हेमंतकुमार, वमशी महाकाली उपस्थित होते.