Click Here...👇👇👇

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे निराधार महिलेस आर्थिक मदत #chandrapur

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) राहुल थोरात 
चंद्रपूर:- घुग्घुस येथील पर्वता कार्लेकर या निराधार महिलेस बुधवारी, १७ ऑगस्ट रोजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्यातर्फे आर्थिक मदत करण्यात आली.
निराधार व वयोवृद्ध पर्वता कार्लेकर यांचे पती मनोहर कार्लेकर यांचे बुधवारी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. गरिबीची परिस्थिती व आर्थिक विवंनचनेत असल्याने याबाबतची माहिती भाजपाचे सतीश कामतवार यांनी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांना आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात येऊन दिली. सामाजिक बांधिली जोपासून भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी निराधार महिलेस तत्काळ आर्थिक मदत केली. त्याअनुषंगाने उपस्थितांनी त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, सिनू इसारप, अमोल थेरे, राजेश मोरपाका, हसन शेख, बबलू सातपुते, रोशन जैस्वाल, सतीश कामतवार, राहुल पचारे, वैभव पचारे व भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.