चंद्रपूरच्या आझाद बागेत मुलींची फ्रीस्टाईल #chandrapur

Bhairav Diwase

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
व्हिडिओ पहा...

चंद्रपूर:- चंद्रपूरच्या आझाद बागेत मुलींची आझाद फ्रीस्टाईल हाणामारी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नव्याने सौंदर्यीकरण झालेल्या या आझाद बागेतील पार्किंगमध्ये झालेल्या लाथा-बुक्क्यांच्या भांडणाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. अगदी कमी वयातील या मुलींनी एका मैत्रिणीला जाब विचारण्याच्या उद्देशाने पार्किंगमध्ये बोलावले.

या व्हिडीओत बोलणे कमी आणि हाणामारी अधिक चित्रित झाली आहे. झकपक तयार होत- हट्टाने दुचाकी घेत ऐन गर्दीच्या ठिकाणी आपली मुलगी फ्री स्टाईल करतेय याची पालकांना जाणीव आहे का? असा प्रश्न विचारला जातोय. सध्या सोशल मीडियावर ही womens WWE भलतीच हिट झालीये.