Top News

गोंडवाना विद्यापीठ सिनेट निवडणुकीत सोयीच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची परवानगी द्यावी:- सौ. किरण संजय गजपुरे #chandrapur


अनेक मतदारांची नावे दुसऱ्या मतदान केंद्रावर समाविष्ट झाल्याने मतदानाबाबत अनिश्चितता

प्रत्येक मतदान केंद्रावर ५०० मतदारांसाठी एक मतदान बुथ देण्यात यावे

चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठाच्या पंचवार्षिक सिनेट निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला असुन येत्या ४ सप्टेंबर ला मतदान होणार आहे. या निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधर मतदार संघातून १० सिनेट सदस्य निवडले जाणार आहेत . या निवडणुकीत नोंदणीसाठी सर्वच संघटनांनी पुढाकार घेतल्याने नोंदणीकृत पदवीधरांची संख्या मागील निवडणूकीच्या तुलनेत दुप्पट झालेली आहे.
२०१७ मध्ये झालेल्या सिनेट निवडणूकीच्या वेळी असलेल्या मतदान केंद्रांची संख्या वाढविण्याची मागणी नागभीडच्या अभाविप च्या सौ. किरण संजय गजपुरे यांनी गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाकडे केली होती व ती मान्य करुन प्रशासनाने अधिकच्या नवीन मतदान केंद्राची निर्मिती केली .
अभाविप व शिक्षण मंच पॅनलचे खुल्या प्रवर्गातील उमेदवार प्रशांत दोंतुलवार , मनोज भुपाल , यश बांगडे , स्वरुप तारगे व डॅा. सागर वझे तसेच राखीव प्रवर्गातील सौ. किरण संजय गजपुरे ( महिला गट), प्रा. धर्मेंद्र मुनघाटे ( ओबीसी गट ) , कु. योगिता पेंदाम ( अनु. जमाती गट ) , जयंत गौरकर ( अनु. जाती गट ) व गुरुदास कामडी ( एन टी गट ) हे प्रत्येक मतदान केंद्रातील मतदारांपर्यत निवडणुक प्रचारासाठी गेले असतांना अनेक मतदारांची नावे दुसऱ्या गावातील मतदान केंद्रात समाविष्ट झाले असल्याचे निदर्शनास आले आहे .यामुळे योग्य नोंदणी करुनही आपले नाव शोधतांना मतदारांची दमछाक होत आहे.
                  यामुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असुन अनेक मतदार मतदानापासुन वंचित राहु शकतात. मतदान केंद्रनिहाय यादी बनवतांना पसंतीचे केंद्राची नोंद मतदारांनी नोंदणी अर्जात केली असतांनाही निवडणुक प्रशासनाकडून योग्य व पसंतीचे केंद्र मिळु शकलेले नाही. यामुळे अनेक मतदारांना स्वगावी मतदान केंद्र असतांनाही दुसऱ्या गावातील केंद्रावर मतदानासाठी जावे लागणार आहे. 
       
गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुक विभागाच्या या घोळामुळे अनेक मतदार मतदानापासुन वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी ४ सप्टेंबर ला होणाऱ्या सिनेट निवडणुकीत प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रनिहाय मतदार यादी सोबतच संपुर्ण मतदार यादी ठेवण्यात यावी व जवळच्या व सोयीच्या मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा अशा मतदारांना देण्यात यावी अशी मागणी अभाविप व शिक्षण मंच पॅनलच्या महिला राखीव गटातील उमेदवार सौ. किरण संजय गजपुरे यांनी  नोंदणीकृत मतदारांच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाच्या निवडणुक प्रशासनाकडे केली आहे. 
          मतदान केंद्रावर असलेल्या निवडणुक अधिकारी व उमेदवारांच्या निवडणुक प्रतिनिधींकडुन खात्री झाल्यावरच ओळखपत्र दाखवून अशा मतदारांना मतदान करण्याची परवानगी देण्यात यावी अशी सुचनाही सौ. किरण संजय गजपुरे यांनी केली आहे. यामुळे मतदानाची टक्केवारीही वाढेल व निवडणुक विभागाच्या झालेल्या चुकीला यातून मतदारांना दिलासापण देता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. 
            या सिनेट निवडणुकीत नोंदणीकृत पदवीधर मतदारांना पंसती क्रमानुसार मतदान करावयाचे असल्याने मतदानाला अधिक वेळ लागत असतो व यामुळे रांगेतील मतदारांना तिष्ठत उभे राहावे लागते. अनेक मतदान केंद्रांवर ५०० हुन अधिक मतदार आहेत त्यामुळे यासोबतच प्रत्येक मतदान केंद्रावर ५०० मतदारांपाठीमागे एक मतदान बुथ केंद्र ठेवावे , जेणेकरुन मतदारांना अधिक वेळ रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही व लवकर मतदान प्रक्रिया होउन वेळ वाचेल अशी मागणी अभाविप व शिक्षण मंच पॅनलच्या महिला राखीव गटातील उमेदवार सौ. किरण संजय गजपुरे यांनी मतदारांच्या वतीने प्रशासनाला केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने