Top News

उपाध्यक्षांच्या वाढदिवसाला नगरपरिषदेचे ग्रहण #Korpana #Gadchandur

विना परवानगीने लावलेले बॅनर न.प.कर्मचाऱ्यांनी काढल्यावर राडा


कोरपना:- गडचांदूर नगरपरिषदेचे उपाध्यक्ष शरद जोगी हे काहीना काही कारणाने सतत चर्चेत असते.असाच एक प्रसंग 1आॕगस्ट रोजी घडला.निमित्त होते जोगी यांचा वाढदिवस.यादिवशी यांचा वाढदिवस होता.नेहमीप्रमाणे त्यांच्या चाहत्यांनी शहर भर शेकडो बॅनर लावले.मुख्य मार्गावरील डिवायडर असो की शहरातील चौक,सर्वीकडे यांनच्या शुभेच्छांचे बॅनरच दिसत होते.हे तर काहीच नाही. हरदोना बस स्टँड,थुटरा बस स्टँड व इतर ठिकाणी सुद्धा यांचे बॅनर दिसत होते.आता आपले भाऊ नगरपरिषदेचे उपाध्यक्ष असल्याने यांच्या कार्यकर्त्यांना बॅनर लावण्यासाठी नगरपरिषदेची परवानगी घेण्याची गरजच भासली नाही.यामुळे यांनी परवानगी न घेता अख्ख्या शहर चक्क बॅनरमय केले.असे असताना जेव्हा नगरपरिषदेचे कर्मचारी कर्तव्य बजावत शहरातील बॅनर काढण्यासाठी एकाठिकाणी पोहोचले असता तेव्हा जोगी व त्यांच्या समर्थकांनी एकच राडा करत बॅनर काढण्यापासून मज्जाव केला.
वास्तविक पाहता नगरपरिषदेने उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाला एका स्टॅम्प पेपरवर लिहून दिले की,शहरात कोणत्याही कार्यक्रमाचे होर्डिंग्ज,बॅनर लावलेले नाही.आणि लावू दिले जाणार नाही.अशी माहिती आहे.बॅनर लावताना यांनी विचारायला पाहिजे होते मात्र अशी कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे कळते.बॅनर काढल्याचा राग मनात धरून उपाध्यक्ष शरद जोगी यांनी थेट पोलीस स्टेशन गाठून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांविरूद्ध स्वतःच्या स्वाक्षरीने तक्रार दाखल केली असून या तक्रारीत विवीध प्रकारे खोटे आरोप कर्मचाऱ्यांवर लावण्यात आले आहे.कायद्याचा ज्ञान नसलेल्या नगरपरिषदेच्या एका जबाबदार व्यक्तीकडून असे कृत्य होणे,आश्चर्या चकीत करणारा प्रकार असून यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे.मुख्याधिकारी या दिवशी नगरपरिषदेत हजर नसल्यामुळे काय करावे,काय नाही,हे समजत नसल्याची खंत काही कर्मचारी व्यक्त करताना दिसत होते.
उपाध्यक्षांनी केलेला पदाचा दुरूपयोग करत कर्मचाऱ्यांना दिलेली वागणूक योग्य की अयोग्य हे मुख्याधिकारी यांनीच ठरवावे. जर अयोग्य असेल तर यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी पावले उचलण्याची गरज आहे.आता ते याप्रकरणी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काही का असेना पण हल्ली नगरपरिषदेत सुरू असलेला सावळा गोंधळ व सत्ताधाऱ्यांमधील अंतर्गत विरोध प्रकर्षाने समोर आल्याची खमंग चर्चा सध्या शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे हे मात्र विशेष.
घडलेल्या प्रकाराबद्दलची हकीकत नगरपरिषदेच्या संबंधित कर्मचाऱ्यांना विचारले असता 'आम्ही आमचे कर्तव्य बजावत होते.बॅनर काढताना बॅनर वरील कोणतेही नेते किंवा कार्यकर्त्यांच्या फोटोंचे कसलेही अपमान किंवा अनादर केले नाही नाही,बॅनर काढत असल्याचा राग धरून आमच्यावर खोटे व बिनबुडाचे आरोप उपाध्यक्षाकडून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे
.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने