🌄 💻

💻

"बॉईज ३" चित्रपटाचा टीझर प्रदर्शित.... #Movie


बॉईज' आणि 'बॉईज २' ह्या चित्रपटांनी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन केलं. त्यातील कलाकारांनी त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. नुकताच बॉईज 3 या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. यात आता कोणती अभिनेती दिसणार याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. नुकतंच त्या अभिनेत्रीचा चेहरा समोर आला आहे.

या चित्रपटात विदुला चौगुले ही त्या मुलीची भूमिका साकारणार आहे. विदुला चौगुले हिने याच्या आधी मराठी सिरियल 'जीव झाला येडा पिसा'मध्ये प्रमुख भूमिकेत काम केले होते. मालिकेमुळे विदुला महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. साधी सरळ अभ्यासू सिद्धी सगळ्यांना आवडली मात्र हिच सिद्धी आता नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. अभिनेत्री विदुला चौघुले मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
'बॉईज ३' हा चित्रपट येत्या १६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल सखाराम देवरुखकर यांनी केले आहे. तर लालासाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, संजय छाब्रिया यांनी निर्मिती केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत