(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा
राजुरा:- विरुर स्टेशनचे ठाणेदार राहूल चव्हाण पोलिस स्टाफ सह पेट्रोलिंग करीत असताना रात्री 8 वाजताच्या सुमारास वरूर रोड येथील जुगार क्लब एका टिनाच्या शेड मधे पैश्याची बाजी लाऊन हार जितचा खेळ खेळीत असताना ठाणेदार राहूल चव्हाण यांच्या टीमने जुगार क्लब वरती धाड टाकले. त्या कारवाईत ७,९०० रुपये चा माल रोख रकमेसह ६ आरोपी जाळ्यात सापडले.
१) आरोपी व्यंकटा नरसय्या रज्जम गडम वय - ४५ रा - इंधनपली ( तेलंगाणा )
२) जगदीश गोड गडमावर वय - ५५
रा - रामपुर ( तेलंगाणा )
३) सत्यनारायण लाच्मया गुऱ्हम
वय - ५८ रा - असिफाबाद ( तेलंगाणा)
४) कलकी क्रीष्णा चंद्रशेखर वय - ४५ रा - पेदापली ( तेलंगाणा)
५) रमेश रेबंना खणक्या वय -३३ रा - रेबेना ( तेलंगाणा)
६) व्यंकटेश मलया तोटा वय - ३६ रा - मंचेरियाल ( तेलंगाणा)
सदर आरोपी वर गुन्हा दाखल करून सुचनापत्रावर सोडण्यात आले आहे. व क्लब चे मॅनेजर वीरू यांच्या कडून प्राप्त महिती नुसार वरुर जुगार क्लब तेथे तेलंगाणा राज्यातून जुगार खेळण्यासाठी लोक येतात व 3-4 पेक्ष्या जास्त ऐका दिवसात जुगार खेळला जातो व दोन वेळा धाड पाळल्यानंतरही हे क्लब कोणाच्या आशीर्वादाने सुरू? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक गावातील लोकांच्या मनात चर्चेचा विषय बनला आहे