Click Here...👇👇👇

पोंभूर्ण्यात जागतिक मुलनिवासी आदिवासी गौरव दिन उत्सहात साजरा #pombhy

Bhairav Diwase

शहरातून निघाली आदिवासी बांधवांची भव्य रॅली

हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधवांची उपस्थिती

रेवा गृप गोंडी पाटा चा सांस्कृतिक दर्शन
पोंभूर्णा:- जागतिक आदिवासी मुलनिवासी आदिवासी दिनाचे औचित्य साधून पोंभूर्णा येथील राज राजेश्वर सभागृहात जागतिक मुलनिवासी आदिवासी गौरव दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी महा गोगो पुजेचे आयोजन तसेच शहरातून भव्य रॅली काढण्यात आली.
रेला गृप गोंडी पाटा यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडून येत होते. सोबतच आदिवासी शोर्य गिताने सांस्कृतिक व सामाजिक चळवळीच्या आदिवासींच्या माहानतेचे दर्शन घडवणारा माहोल कार्यक्रम स्थळी बनला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटक देवाडा खुर्दचे सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते विलास मोगरकार,अध्यक्षस्थानी गो.ग.पा.चे राष्ट्रीय कार्यवाह मनोज आत्राम, सह उद्घाटक डॉ.संदिप शेंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.प्रविण येरमे,जगन येलके, श्रीहरी सिडाम,गणपत नैताम,मुर्लीधर टेकाम, दर्शन शेडमाके, वर्षा मोगरकार,गणेश परचाके,कांता मडावी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय कोया पुनेम भूमक सगामादी , गो.ग.पार्टी, बिरसा क्रांतीदल जंगोमदल, आदिवासी कर्मचारी संघटना, आदिवासी महिला संघटना,गोंदोला गृप संघटना यांचे वतीने करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोगपाचे तालुका अध्यक्ष जगन येलके यांनी तर संचालन इंदु उईके यांनी केले.