Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

रोटरी क्लब भद्रावतीचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न #Bhadrawati


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती :- रोटरी क्लब भद्रावतीचा पदग्रहण सोहळा स्थानिक स्वागत सभागृहात नुकताच थाटात पार पडला. यावेळी डिस्ट्रिक्ट 3030 असिस्टंट गव्हर्नर माया मीहानी, हिंगणघाट यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. माला प्रेमचंद यांनी रोटरी क्लब भद्रावतीच्या 2022- 23 वर्षाच्या अध्यक्षपदाचा तर रोटेरियन अनिल धानोरकर यांनी सचिव पदाचा पदभार एका दिमाखदार अशा सोहळ्यात स्वीकारला. डॉक्टर माला प्रेमचंद यांनी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष प्रा. सचिन सरपटवार यांच्याकडून तर रोटेरियन अनिल धानोरकर यांनी रोटरी क्लब चे माजी सचिव अब्बास अजानी यांचे कडून पदभार स्वीकारला.
रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट 3030 च्या असिस्टंट गव्हर्नर माया मीहानी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून  अध्यक्ष डॉक्टर माला प्रेमचंद,  सचिव नगराध्यक्ष अनिल धानोरकर ,21- 22 चे  अध्यक्ष प्रा. सचिन सरपटवार, सचिव अब्बास अजानी, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सुनिता खंडाळकर ,सचिव मनीषा ढोमणे व्यासपीठावर उपस्थित होते.
2021- 22 मध्ये रोटरी क्लब भद्रावतीला चार अवार्ड प्राप्त झाले. रिटेन्शन ऑफ मेंबर्स तसेच ग्रोथ ऑफ मेंबर्स साठी रोटरी क्लब भद्रावतीचे अध्यक्ष प्रा.सचिन सरपटवार व सचिव अब्बास अजानी यांचा तर ग्रीटिंग व पॉल हॅरीस फेलोशिप साठी भाविक तेलंग यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
तसेच रोटरी क्लब भद्रावतीचे माजी अध्यक्ष व सचिव यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सुरुवातीला दिवंगत रोटेरियन स्व. मदन ताठे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी ताठे परिवाराचा तथा आदित्य प्रकाश पिंपळकर या युवकाचाही त्याच्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.
       डॉक्टर माला प्रेमचंद यांनी पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या प्रोजेक्टची माहिती दिली. तसेच सचिव अनिल धानोरकर यांनी रोटरी क्लब विषयी माहिती देत भद्रावतीकरांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणातून रोटेरियन माया मी हानी यांनी रोटरी ची भूमिका कथन केली.रोटरी चे दुसरे नावच हे सामाजिक कार्य आहे हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले. यावेळी विक्रांत बी, विवेक आकोजवार व प्रकाश पिंपळकर यांनी परिचय वाचन केले. नव्यानेच रोटरी प्रवेश करणाऱ्या किशोर भोसकर , दिलीप राम , वंदना धानोरकर, रुकसाना शेख, स्नेहल निर्मल , चंद्रकांत खारकर , महेंद्र गावंडे यांचाही सत्कार करण्यात आला.
      कार्यक्रमाचे संचालन आत्माराम देशमुख, प्रशांत तेलंग यांनी केले. प्रास्ताविक प्रा. सचिन सरपटवार तर आभार अब्बास अजाणी यांनी मानले.याप्रसंगी रोटरी क्लब भद्रावतीचे माजी अध्यक्ष तथा सचिव तसेच सदस्य उपस्थित होते.यामध्ये डॉ. प्रवीण केशवानी, अविनाश सिद्धमशेट्टीवार ,एड. युवराज धानोरकर, विनोद घोडे ,सुनील पोटदुखे, भाविक तेलंग, किशोर पत्तीवार, चंपत अस्वले ,किशोर खंडाळकर, प्रवीण महाजन ,विनोद कामडी, सुधीर पारोधी, आनंद क्षीरसागर, राजेश गुंडावार, किशोर बावणे, डॉ. अमित प्रेमचंद,प्रकाश पिंपळकर, हनुमान घोटेकर, विवेक आकोजवर, गिरीश पवार, वसंत उमरे, तुषार सातपुते, सुरेंद्र राऊत यांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत