Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

नियमित न चालविणाऱ्या स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करा #chandrapur #bhadrawati


ग्राहक पंचायतची मागणी

ग्राहक पंचायतकडे अनेक ग्राहकांच्या तक्रारी

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- भद्रावती येथील न चालविल्या सरकारी स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई करावी अशी मागणी येथील ग्राहक पंचायत ने एका निवेदनाद्वारे केली आहे.
येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान क्र. ७१, सूर्यमंदिर वार्ड, बगडे वाडी (किल्ला वार्ड) हे मागील बरेच दिवसापासून १ ते ३१ तारखेपर्यत कधीच नियमीत चालू राहत नाही. त्यामुळे मोलमजूरी करणारे सकाळी ७ वाजेपासून दुकानासमोर बसून वाट पाहत राहतात व शेवटी दुकान‌ न उघडल्यामुळे ते परत जातात. त्यामुळे त्यांची कामावर जायची वेळ निघून जाते आणि त्यांची रोजी बुडत आहे. त्यानंतर दुस-या दिवसीही दुकानासमोर तासनतास उभे राहून दुकान उघडत नाही आणि हे आता दैनंदिन झाले आहे. अश्या ब-याच नागरीकांच्या स्वाक्षरीने लिखीत तक्रारी ग्राहक पंचायत कडे आल्या आहे. त्यामुळे ग्राहकांच्या होणा-या गैरसोयीची गंभीर दखल घेऊन दुकान दारावर कारवाई करून ग्राहकांना नियमित धान्य पुरवठा होईल आणि नागरिकांचा शारिरीक, मानसीक व आर्थिक त्रास कमी होईल असे ठोस पाऊल उचलावे. तसेच शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकान दारांना यासंबंधी सुचना द्यावा. अशी मागणी ग्राहक पंचायत, भद्रावतीने केली आहे.
यावेळी पदाधिकारी वामन नामपल्लीवार, वसंत वर्हाटे, अशोक शेंडे, सुदर्शन तनगुलवार, मोहन मारगोनवार, केशव मेश्राम, गुलाब लोणारे आदी उपस्थित होते.

उचित कारवाई होणे आवश्यक

सरकारी स्वस्त धान्य दुकान उघडण्याची वेळ, उघडण्याचे दिवस, चालू महिन्यात कोणते धान्य आणि इतर राशन मिळणार, दुकानातील धान्याचा साठा, विकल्या जाणा-या वस्तूंच्या किमतीची माहिती इत्यादी माहीती बद्दल फलक लावणे अनिवार्य असतांना सुद्धा कोणत्याही स्वस्त धान्य दुकानां समोर असे फलक लागलेले दिसत नाही. त्यामुळे तहसिलदार साहेब यांनी गंभीरपणे याकडे लक्ष देऊन उचीत कारवाई करावी.
प्रविण चिमुरकर
सहसचिव
अ.भा. ग्राहक पंचायत भद्रावती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत