शब्दांकूर फौंडेशन तर्फे उत्कृष्ठ शिक्षक सन्मान वितरण सोहळा संपन्न #chandrapur #gondpipari


शिक्षकांना प्रेरित करणारा स्तुत्य उपक्रम:- सुधाकर अडबाले
चंद्रपूर:- "ध्यास एक परिवर्तनाचा" हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून शब्दांकुर फौंडेशन,चंद्रपूरने उत्कृष्ठ शिक्षक तथा उत्कृष्ठ शाळा सन्मान-२०२२ चा पुरस्कार वितरण सोहळा पंचायत समिती, गोंडपीपरी सभागृहात पार पडला.
कार्यक्रमाचे उदघाटक श्री सुधाकर अडबाले सरकार्यवाह वि.मा.शि.संघ व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.संतोष बांदूरकर जनता कनिष्ठ महाविद्यालय गोंडपीपरी, विशेष अतिथी श्री चेतन सिंह गौर नगरसेवक न.प.गोंडपीपरी, प्रमुख अतिथी गणपत चौधरी अध्यक्ष व्यसनमुक्ती संघटना,डॉ.नितेश पावडे,श्री सातपुते जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त,श्री दुशांत निमकर अध्यक्ष शब्दांकूर फाऊंडेशन यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा रोजी संपन्न झाला.
या कार्यक्रमात गोंडपीपरी तालुक्यातील आठ केंद्रातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या आठ शिक्षकांना शब्दांकूर फाउंडेशन,चंद्रपूर तर्फे उत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार-२०२२ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.त्यात कु.अर्चना जिडकुंठावार धानापूर केंद्र-करंजी,झुंगा कोरडे चक पिपरी केंद्र-गोंडपीपरी, बंडू फोफरे कुलथा केंद्र-वढोली,सौ.नंदिनी पिंपळकर नांदगाव केंद्र-विठ्ठलवाडा,बंडू गंधेवार धामणगाव केंद्र-भं.तळोधी,अमोल नैताम हिवरा केंद्र-वेडगाव,नितीन चापले चक सोमनपल्ली केंद्र-धाबा, टिकेश्वर चुदरी आर्वी केंद्र-तोहोगाव इत्यादी व गौतम खोब्रागडे,विनोद चांदेकर,राजू राजकोंडवार,अमृता पोटदुखे,गुरुदेव बाबनवाडे यांच्या सामूहिक प्रयत्नाने यशोशिखर गाठलेल्या गोंडपीपरी तालुक्यातील नंदवर्धन शाळेला उत्कृष्ठ शाळा पुरस्कार-२०२२ देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी उदघाटक श्री सुधाकर अडबाले यांनी या कार्यक्रमातून शिक्षकांना प्रेरणा मिळते व भविष्यात चांगले कार्य करण्यासाठी प्रेरित होतात असे गौरवोद्गार काढले.सदर कार्यक्रमाला श्री श्रीकृष्ण अर्जुनकर मुख्य कार्यकारी अधिकारी गृहलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्था,गडचिरोली यांनी आर्थिक सहकार्य केले त्यात पुरस्कार प्राप्त शिक्षक नितीन चापले,सौ.नलिनी पिंपळकर,श्री.गौतम खोब्रागडे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच गणपत चौधरी यांनी शाळेमध्ये विद्यार्थी,पालक व शिक्षकांनी व्यसनमुक्तीचा संकल्प करावा असे आवाहन केले तसेच चेतन गौर यांनी जिल्हा परिषद शाळेत मिळणाऱ्या प्राथमिक शिक्षणातून पुढील आयुष्याची पायाभरणी होते व सन्मानाचे महत्त्व काय होते हे आपल्या मनोगतातून व्यक्त केले तर अध्यक्ष भाषणामध्ये पुरस्काराचे महत्व,शिक्षकांची भूमिका,विद्यार्थ्यांची प्रतिभा ओळखून अध्यापन करण्यात यावे याविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे उत्कृष्ठ सूत्रसंचालन शब्दांकूर फाउंडेशनचे सचिव राजेश्वर अम्मावार यांनी केले तर मान्यवरांचे आभार तानाजी अल्लीवार कार्याध्यक्ष शब्दांकूर साहित्य मंच,चंद्रपूर यांनी केले.कार्यक्रमाची यशस्वीता साधण्यासाठी इष्टाम सर,मंगेश पेंदाम,कनाके भाऊ,राहुल पिंपळशेंडे, राकेश शेंडे,किशोर भोयर,गौतम उराडे,रत्नाकर चौधरी,मिलिंद मडावी,सुदर्शन भोगेकर, प्रेमदास निकुरे,हिरामण सिडाम,अरुण गावतुरे इत्यादी शिक्षक मित्रांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत