युवा उद्योजकांची केंद्रीय मंत्री पुरीना बांबू डायरी भेट


बांस विथ नेचर प्रा. ली. कँपनीचा उपक्रम

बांबूचा निर्मित वस्तूंचा वापर वाढविण्याचा प्रयत्न
चंद्रपूर:- केंद्रीय मंत्री हरदीप एस पुरी यांना बांस विथ नेचरचे संचालक व युवा बांबू उद्योजक विशाल राठोड यांनी 24 सप्टेंबरला बांबू डायरी भेट दिल्याने केंद्रीय मंत्री पुरी यांनी विशालचे कौतुक केले.
यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर, सिनेट सदस्य यश बांगडे, ऐश्वर्य बांगडे यांची उपस्थिती होती.
बांस विथ नेचर ही संस्था मागील काही वर्षा पासून बांबू क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. बांबू कारागिरांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून ही संस्था प्रयत्नशील असून शनिवारी 100% बांबू पासून निर्मित डायरी पेट्रोलियम मंत्री हरदीप एस पुरी यांना भेट देण्यात आली.
मंत्री महोदयांनी ती डायरी सोबत ठेवल्याने युवकांना आनंद झाला. विशेष म्हणजे या डायरी सोबत बांबू पासून निर्मित पेनही देण्यात आली. बांबू पासून निर्मित वस्तूंचा वापर वाढला तर वस्तूंच्या किंमती कमी होऊ शकतात, असा युक्तीवाद यावेळी ना. पुरी यांचेशी संवाद साधताना राठोड यांनी केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत