Top News

सुसाईड नोटमुळे खळबळ... #Chandrapur #Korpana #Gadchandur


"त्या" दोघांमुळे विलासने चिठ्ठी लिहून संपवली जीवनयात्रा
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या प्रभाग क्रमांक 5 वार्ड क्रमांक 3 मधील रहिवासी विलास वासुदेव मांडवकर वयवर्ष अंदाजे 50 यांनी आत्महत्या केल्याची घटना 11 सप्टेंबर रोजी समोर आली असून सदर घटना शेत विक्रीच्या व्यवहारातून घडल्याचे विलास यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या 'सुसाईड नोट' च्या मजकुरातून कळते.'शरद जोगी आणि प्रशांत पाचभाई या दोघांमूळे आपली आत्महत्या करीत असल्याचे स्पष्ट मत मृत विलास यांनी त्या चिठ्ठीमध्ये मांडले असून यांना अटक करून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
मनोज शर्मा नामक एका व्यक्ती सोबत 5 एकर जमीनचा 60 लाखात सौदा केला होता.आणि जी जमीन रोडमध्ये जात आहे त्याचा मोबदला आम्हाला मिळावा असे म्हटले होते.आमचे सोबत असलेले दिनेश सोनी,मनोज शर्मा,बाळू घायवनकर,गजानन,पंकज...यांनी आमचे आई-वडिलांकडून 11.5 एकरची रजिस्ट्री करून घेतली.प्रशांत पाचभाई यांनी मला कुठेही जाऊ दिले नाही.कारण शरद यांनी प्रशांत पाचभाई याला पैशाचे आमिष दाखवून आमच्या कडून काम करून घेतो.(सुसाईड नोट मध्ये बाकीचा मजकूर अस्पष्ट आहे.)तर अशाप्रकारे मृत विलास यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.
'वडगाव साईडला आमच्या आजीच्या नावाने 11 एकर जमीन होती. 5 एकर विकतो म्हणून शरद जोगी सोबत सौदा केला आणि 11 एकरची जमीन रजिस्ट्री करून घेतली.चेकद्वारे पैसे दिले.आणि ते चेक वापस द्या,असा दबाव टाकला आमच्यावर.आम्ही नाही म्हलो दबाव टाकून एक चेक नेला.यानंतर पुन्हा दबाव टाकून जो चेक आम्ही जमा केला होता तो चेक सुद्धा आम्हाला वापस द्या असे म्हणत होते आणि नाही दिल्यास तुझ्या पोराला मारून टाकीन असे धमक्या देत होते.याच कारणाणे आज बाबाने विष पेवून आपले जीवन संपवले.' असे मृत विलासच्या मुलाने म्हटले आहे.दरम्यान नातेवाईकांनी विलासचा मृतदेह पोलीस स्टेशन समोर ठेवून या दोघांना त्वरित अटक करा अन्यथा प्रेत उचलणार नाही,असा इशारा दिला होता.
'शरद जोगी आणि पोतनूरवार यांनी जमीन खरेदी केली होती.आमचे पैसे वापस करा म्हणून शरद जोगी आणि पाचभाई धमकी देत होते.आम्ही नाही म्हटले तर यांना(पतीला)धमकी देत होते.तुमच्या मुलाला काही करीन,म्हणून यांना असं करावं लागलं.यांच्या मुळेच यांनी विष पेले' असे मृत विलासच्या पत्नीने म्हटले आहे.
सदर घटने संदर्भातील कागदपत्रे गडचांदूर पोलीस स्टेशन मध्ये नाही. चंद्रपूर येथे यांचा मृत्यू झाला. PM सुद्धा तिथेच झालं. फक्त सुसाईड नोट यांनी आता आम्हाला दाखवली. याच्या सखोल व निष्पक्ष चौकशीसाठी अधिकारी नेमण्यात येईल आणि शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्यातील अहवालानुसार कारवाई करण्यात येईल.सध्या बयान नोंदविण्यात येत आहे.रिपोर्ट आल्याशिवाय काहिच करता येणार नाही.
सत्यजित आमले
ठाणेदार पोलीस स्टेशन गडचांदूर.

दरम्यान मृत विलासचा मृतदेह पोलीस स्टेशन समोर ठेवून या दोघांना आत्ता अटक करा, अन्यथा प्रेत उचलणार नाही असा पवित्रा घेतला होता. भाजप शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार, निलेश ताजने, नगरसेवक अरविंद डोहे, शिवसेना गटनेता तथा नगरसेवक सागर ठाकूरवार, काँग्रेसचे चुदरी, मृत विलासचा मुलगा व एका नातेवाईकासोबत ठाणेदार आमले यांनी सविस्तर चर्चा करून शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्याप्रमाणे कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि प्रेत उचलण्यात आले.रात्री उशीरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
'शरद जोगी हे गडचांदूर नगरपरिषदेत उपाध्यक्षपदी विराजमान असून जमीन मागील अंदाजे 8,10 वर्षापासून जमीन खरेदी,विक्रीचा व्यवसाय करीत आहे.शहर व शहरा बाहेर यांनी आदिवासी,गैर आदिवासींचे कृषक जमीनी कवडीमोल भावाने खरेदी करून स्वतः प्लॉट पाडले आणि गरजूंना 100 रुपयांच्या स्टैंप पेपरवर विक्री केल्या.एक प्लॉट अनेकांना विकले,उपनगराध्यक्ष असल्याने रोड,नाली,लाईट,पाण्याची सुविधा उपलब्ध करून देतो,न.प.च्या रेकॉर्डवर नोंदणी करून देतो,असे एकना अनेक आश्वासन देऊन प्लॉट विकून मोकळे झाले.आणि प्लॉट धारकांनी विचारल्यावर उलट त्यांनाच धमकावणे,असे प्रकार सर्रस सुरू असल्याचे आरोप होत आहे.आजही कित्येक प्लॉट खरेदी करणारे आश्वासन दिलेल्याप्रमाणे सुविधांपासून वंचित आहे.जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केल्या मात्र काहिच होत असल्याची खंत व्यक्त होत आहे.विलास प्रकरणी असच काही प्रकार घडला असावा म्हणून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला अशी चर्चा सुरू आहे.गोरगरीब आदिवासींची जमीनी घेणे आणि स्टँप पेपरवर विकून शासनाचा महसूल बुडवणे हाच एककलमी कार्यक्रम शरद जोगी राबवित असल्याची चर्चा या प्रकरणावरून शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत असून यासाठी त्यांनी काही दलाल सुद्धा नेमल्याचे कळते.ठाणेदार आमले यांनी दोन पंचा समोर विलासच्या मुलाने दिलेल्या सुसाईड नोट जमा केले आहे.ऐवढ्या मोठ्या व्यक्तीवर आरोप झाल्यामुळे येणाऱ्या शवविच्छेदन अहवालातून काय चित्र बाहेर येते ? त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
                

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने